‘मांजरा’तील एक्सेस पाण्याचा मुद्दा पुन्हा अजेंड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:34 AM2021-05-27T04:34:22+5:302021-05-27T04:34:22+5:30

फाेटाे आहे.. कळंब -मांजरा प्रकल्पातील ‘एक्सेस’पाणी कायम निर्जळी असलेल्या रायगव्हान मध्यम प्रकल्पात सोडण्याची ‘व्यवहार्य योजना’ नव्याने प्रस्तावित होत आहे.यानुसार ...

The issue of access water in the 'cat' is on the agenda again | ‘मांजरा’तील एक्सेस पाण्याचा मुद्दा पुन्हा अजेंड्यावर

‘मांजरा’तील एक्सेस पाण्याचा मुद्दा पुन्हा अजेंड्यावर

googlenewsNext

फाेटाे आहे..

कळंब -मांजरा प्रकल्पातील ‘एक्सेस’पाणी कायम निर्जळी असलेल्या रायगव्हान मध्यम प्रकल्पात सोडण्याची ‘व्यवहार्य योजना’ नव्याने प्रस्तावित होत आहे.यानुसार मांजरा नदीवरील लासरा बॅरेजवरून रायगव्हान प्रकल्पात पाणी प्रयोजन असून यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व्हेक्षणात 'लासरा टू रायगव्हान' या टप्प्यातील स्थापित जलस्रोतांची ओंजळ भरली जावी,असा आग्रह खासदार, आमदार यांनी धरला आहे.

कळंब तालुक्यातील दाभा व केज तालुक्यातील धनेगावच्या शिवेवर मांजरा प्रकल्पाची उभारणी झाली. लातूर, बीड व ऊस्मानाबाद या तिनही जिल्ह्यासाठी महत्वाचा असलेला हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर वाहून जाणारे पाणी पुढं कर्नाटकात जात होतं. यामुळेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून पुढे मांजरा नदीवर जवळपास ६५ दलघमी क्षमतेचे १५ बॅरेजेस उभारण्यात आले.

एकीकडे असे चित्र असताना मांजरा प्रकल्पापासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील रायगव्हान येथील १२ दलघमी क्षमतेचा मध्यम प्रकल्प कायम कोरडेठाक असतो. रायगव्हान, पिंप्री शी, जायफळ, बोरगाव बु, नायगाव यासह लातूरमधील निळकंठ भोसा, पिंपळगाव, भिसे वाघोली, गाधवड, माटेफळ आदी गावांना फायदा होत असलेल्या या प्रकल्पाची झोळीच रिती राहत आहे.

यामुळेच मांजरा प्रकल्पातील ‘एक्सेस’ पाणी रायगव्हान प्रकल्पात जोडकालव्याने आणण्याचा विषय २००९ मध्ये पुढे आला अन् लातूरकरांचा यास 'ग्रीन सिग्नल' मिळाल्याने मंजूरही झाला. मात्र ५७ कोटीची निविदा प्रक्रिया झालेली ही योजना पुढे बासनात गुंडाळली गेली. त्यानंतर मागच्या दहा महिन्यात हा विषय पुन्हा अजेंड्यावर आला आहे. याविषयी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी नोव्हेंबर महिन्यात बैठक घेत बंद पाईपलाईनच्या पर्यायाचा विचार करत सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यानंतर शनिवारी ऊस्मानाबाद येथे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी बीड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता इलियास चिश्ती यांच्यासमवेत उस्मानाबादेत येथे बैठक घेतली. यावेळी रायगव्हानचे माजी सरपंच दत्ता आवाडही उपस्थित होते. या बैठकीत खासदार, आमदार यांनी रायगव्हान जोड कालव्याच्या कामाचे नव्याने सर्वेक्षण करताना या मार्गाच्या परिघात येणाऱ्या पाझर, तलाव, लपा तलाव अशा स्थापित साठवणीत पाणी वळते होईल यांचा अंतर्भाव करावा , अशी आग्रही मागणी केली आहे.

चौकट...

लासरा बॅरेज टू रायगव्हान....

मांजरा प्रकल्पाच्या खाली उभारण्यात आलेल्या १५ बॅरेजसमध्ये पहिला बॅरेज लासरा येथे आहे. याठिकाणावरन मांजराचे ओव्हरफ्लो झालेले पाणी रायगव्हान प्रकल्पात सोडण्याचे नियोजन आहे. साधारणतः दहा किमीपैकी चार किमी बंद पाईपलाईन व सहा किमी कालव्यातून पाणी आणण्याचे सर्व्हेक्षण नियोजित आहे.याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ व्हावा असा माझा व खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा प्रयत्न आहे. याविषयी जलसंपदा मंत्र्याची लवकरच भेट घेणार आहोत असे आ. कैलास पाटील यांनी सांगितले.

यापूर्वी निविदा प्रक्रिया झाली अन् ...

रायगव्हानमध्ये मांजरातील एक्सेस पाणी आणण्यासाठी ऑगस्ट २००९ मध्ये गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या लातूर येथील निम्न तेरणा कालवा विभाग क्रमांक दोन यांनी निविदा सूचना क्रमांक बी १/३ २००९-१० ही 'रायगव्हान फिडर कालवा मातीकाम व बांधकाम करणे' या कामाची ५७ कोटी अंदाजपत्रकीय किंमत असलेली निविदा काढली होती. मात्र पुढे विविध कारणे देत ही योजना गुंडाळण्यात होती. यानंतर जोडकालवा कृति समितीच्या माध्यमातून योजनेचा विषय पुन्हा एकदा अजेंड्यावर आला आहे.

मांजरा चौदावेळा ओव्हरफ्लो....

२२४ दलघमी क्षमतेचा मांजरा प्रकल्प १९८८ साली प्रथम ओव्हरफ्लो झाल्यानंतर पुढे १३ वेळा प्रकल्प ओव्हरफ्लो तर तीनवेळा क्षमतेच्या आसपास साठा झाला होता.

रायगव्हानचा 'रिता' इतिहास रायगव्हानचा मागच्या वीस वर्षाचा लेखाजोखा पाहिला तर २००१, २००६, २००९, २०११, २०१७ असा पाचवेळा ओव्हरफ्लो झालेला हा प्रकल्प पाचवेळा कोरडेठाक, तीन वर्ष नाममात्र तर इतर सालात अदखलपात्र साठा स्थितीत होता.

Web Title: The issue of access water in the 'cat' is on the agenda again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.