काेराेनासदृश्य आजारावर काढा ठरताेय गुणकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:31 AM2021-05-24T04:31:06+5:302021-05-24T04:31:06+5:30
- अर्चना शशिकुमार भातलंवडे, कळंब. घरातील स्वयंपाकासाठी लागणारी हळद, अर्द्रक यासह मसाल्याच्या पदार्थांतील मिरी, लवंग, विलायची, दालचिनी आदींचा औषधी ...
- अर्चना शशिकुमार भातलंवडे, कळंब.
घरातील स्वयंपाकासाठी लागणारी हळद, अर्द्रक यासह मसाल्याच्या पदार्थांतील मिरी, लवंग, विलायची, दालचिनी आदींचा औषधी म्हणून आम्ही अनेकदा उपयोग करतो. पेरू, लिंबू, जांभूळ यांचे पान, गवती चहा व तुळशीच्या मंजुळा किंवा पाने यांचा एकत्रित काढा घेतला जातो. कोरोनाकाळात असे घरगुती उपाय अनेकदा केले आहेत. दुपारी गुळवेल काढा घेण्यावर भर देतो.
-सरस्वती घुले-आडसूळ, कळंब.
कफ, खोकला झाल्यावर गरम पाण्यात हळद, गरम दुधात हळद दिली जाते. कफ जास्त वाढल्यास भांड्यात पुदिना टाकत वाफ घेतली जाते. तुळशीचा अर्क घेतला जातो. चहात तुळशीचा अर्क उतरवला जातो. घरच्या घरी सर्दी, खोकला, ताप, कफ झाल्यावर उपरोक्त साधनांपासून घरगुती उपचार केले जात आहेत.
- दुर्गाबाई शिवशंकर घोंगडे, कळंब.