घरफोडीप्रकरणी उस्मानाबाद येथील सराफाला अटक
By Admin | Published: June 30, 2017 04:29 PM2017-06-30T16:29:37+5:302017-06-30T16:29:37+5:30
चड्डी-बनियन गँगकडून घेतले ३५ तोळे सोन्याचे दागिने
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ३0 :घरफोड्या करणाऱ्या चड्डी-बनियम गँगकडून ३५ तोळे सोन्याचे दागिने विकत घेणाऱ्या कळंब-उस्मानाबाद येथील सराफाला स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीसांनी शुक्रवारी अटक केली. संशयित प्रशांत गोविंदराव वेदपाठक (वय ३५) असे त्याचे नाव आहे. त्याचा आणखी एक सराफ साथीदार पसार आहे. त्याच्यासह टोळीतील आणखी साथीदारांचा शोध पोलीस घेत असल्याचे निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्"ात सुमारे ६० हून अधिक घरफोड्या झाल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीसांनी उस्मानाबाद इटकूर येथील एका वसाहतीवर छापा टाकून संशयित दत्ता आत्माराम काळे (वय २५), रामेश्वर छना शिंदे (३९), राजेंद्र आबा काळे (२४ ) व अनिल भगवान काळे (४९, सर्व रा. इटकूर, ता. कळंब) या चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ८६ हजार ४० रुपये किंमतीचे ३० ग्रॅम सोन्याचे दागिने, आठ हजार ११० रुपये किंमतीचे २११ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, १२ चलनी नोटा, त्यामध्ये या पाच देशांचे परकीय चलन, तीन मोबाईल, कॅमेरा, चाकू व एक पंच असा मुद्देमाल जप्त केला होता. त्यांनी चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने कळंब येथील प्रशांत वेदपाठक या सराफाला विकले होते. त्यानुसार पोलीसांनी त्याला अटक केली.
टोळीप्रमुख संशयित विलास छना शिंदे याच्यासह सहाजण पसार असून त्यांचा शोध घेतल्याचे मोहीते यांनी सांगितले.