यशस्वी जीवनासाठी मन सदृढ ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:37 AM2021-09-12T04:37:24+5:302021-09-12T04:37:24+5:30
उमरगा : विद्यार्थ्याना जीवनामध्ये अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागते. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या मनाला विचलित होऊ द्यायचं नसतं. अलिकडे ...
उमरगा : विद्यार्थ्याना जीवनामध्ये अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागते. अशा स्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या मनाला विचलित होऊ द्यायचं नसतं. अलिकडे विद्यार्थ्यांचे मन हे नकारात्मक विचारात गुंतत चाललेले आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी मन सदृढ ठेवणे आवश्यक असून, यासाठी ध्यान-धारणा, प्राणायाम, योगा यासारखे व्यायाम करावेत, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. अनिता राठोड यांनी केले.
येथील शरणाप्पा मलंग विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘सदृढ मन हेच यशस्वी विद्यार्थी जीवनाचा पाया’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सुरेखाताई मलंग तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिता राठोड, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग, रेखाताई सूर्यवंशी, मुख्याध्यापक अजित गोबारे, कुमार स्वामी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कविराज रेड्डी उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजकुमार जाधव यांनी केले तर सतीश कटके यांनी आभार मानले. व्याख्यानमालेसाठी आगतराव मुळे, विवेकानंद पाचंगे, बालाजी हिप्परगे, परमेश्वर सुतार, प्रभावती बिराजदार, मीनाक्षी हत्ते, परमेश्वर कोळी, कलशेट्टी पाटील, मोहन साखरे, दुष्यंत कांबळे व कुमार स्वामी प्राथमिक विद्यामंदिरचे शिक्षक यांनी सहकार्य केले.