लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या खराडे तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 05:14 PM2022-02-14T17:14:04+5:302022-02-14T17:14:22+5:30

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष दोन्ही जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

Kharade of Shiv Sena as Mayor of Lohara Nagar Panchayat and Shaikh of NCP as Deputy Mayor | लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या खराडे तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शेख

लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या खराडे तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शेख

googlenewsNext

लोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या वैशाली खराडे तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आयुब शेख यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष बैठक बोलावण्यात आली. यावेळी  पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गणेश पवार होते. मुख्याधिकारी गजानन शिंदे, कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे याची उपस्थित होती. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निवडणूकपूर्वी शिव राष्ट्र आघाडी करण्यात आली होती. त्यात आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवित ११ जागांवर विजय मिळाला. यात शिवसेना ९ , राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांचा समावेश आहे. काँग्रेसने ४ तर दोन जागावर  अपक्ष विजयी झाले.

दरम्यान, नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी आघाडीकडून शिवसेनेच्या वैशाली खराडे तर काँग्रेसकडून प्रशांत काळे यांनी उमेदवारी दाखल केली होती. परंतु काळे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडीतून माघार घेतल्याने खराडे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया पार पडली. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आयुब शेख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला. त्यामुळे आयुब शेख यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी गणेश पवार यांनी जाहीर केले.

यावेळी शिवसेनेच्या गटनेत्या सारिका बंगले, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते जालिंदर कोकणे, काँग्रेसचे गटनेते आरिफ खानापुरे, नगरसेविका शामल माळी, मयूरी बिराजदार, कमल भरारे, शमाबी शेख, सुमन रोडगे, आरती कोरे,आरती गिरी, संगिता पाटील, गौस मोमीन,  अमीन सुंबेकर, विजय ढगे, प्रशांत काळे आदी नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर नगरपंचायतीच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी करीत अनंद साजरा केला.

Web Title: Kharade of Shiv Sena as Mayor of Lohara Nagar Panchayat and Shaikh of NCP as Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.