अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:23 AM2020-12-27T04:23:52+5:302020-12-27T04:23:52+5:30
जकेकूर चौरस्ता येथून अज्ञाताने दुचाकी पळविली उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील किलज येथील शिवय्या विरभद्रय्या स्वामी यांनी आपली दुचाकी क्र. ...
जकेकूर चौरस्ता येथून अज्ञाताने दुचाकी पळविली
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील किलज येथील शिवय्या विरभद्रय्या स्वामी यांनी आपली दुचाकी क्र. एमएच. २५. एएन १०४६ ही २४ डिसेंबर रोजी जकेकूर चौरस्ता येथे उभी केली होती. ती त्यांना अर्धा तासानंतर उभ्या केलेल्या ठिकाणी आढळून नाही. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी सापडत नसल्याने स्वामी यांनी उमरगा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दिली. यावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद झाला.
निलेगाव शिवारातून शेळ्या अन् बोकड चोरले
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथील अभिषेक जमादार यांचे निलेगाव शिवारातील शेतात पत्रा शेड व गोठा आहे. या शेड व गोठ्यात २४ डिसेंबर रोजी त्यांनी १५ शेळ्या, ४ बोकड अन् ६ पिल्ले बांधले होते. ते अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. चोरी झाल्याचे समजताच जमादार यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दिली. यावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.
जुन्या भांडणावरुन एकास पट्ट्याने मारहाण
उस्मानाबाद : जुन्या भांडणाची कुरापत काढून चाैघांनी एकास बेदम मारहाण केली. ही घटना २२ डिसेंबर रोजी तेर येथे घडली.
तेर येथील विशाल कांबळे हे आपल्या दुकानासमोर उभे होते. यावेळी गावातीलच सोमनाथ अंकुशे, अविराज माने, पवन माने, सचिन देवकते यांनी तेथे येऊन जुन्या भांडणाच्या कुरापतीवरुन विशाल यांना शिवीगाळ करीत चामडी पट्ट्याने, काठीने मारहाण केली. विशाल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उपरोक्त चौघांविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.
४२६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
उस्मानाबाद : वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी जिल्ह्यातील विविध मार्गावर ४२६ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून ९५ हजार ३०० रुपयांचा तडजोड शुल्क वसूल करण्यात आला. या कारवाया जिल्ह्यातील १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आल्या.