'तुला आज जीतं ठेवत नाही' म्हणत विहिरीत ढकलून पत्नीचा खून
By बाबुराव चव्हाण | Updated: January 20, 2024 17:59 IST2024-01-20T17:54:52+5:302024-01-20T17:59:10+5:30
कांदलगावातील धक्कादायक घटना : नवऱ्याविरूद्ध खुनाचा गुन्हा नाेंद

'तुला आज जीतं ठेवत नाही' म्हणत विहिरीत ढकलून पत्नीचा खून
धाराशिव : दारू पिऊन आलेल्या नवऱ्याने ‘‘तुला आज जीतं ठेवतच नाही, असं म्हणत आपल्या पत्नीला बाजुच्या विहिरीत ढकलून देवून खून केला. ही धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील कांदलगाव शिवारात शुक्रवारी दुपारी घडकीस आली. या प्रकरणी पतीविरूद्ध परंडा ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटक राज्यातील बाेन्ती येथील रहिवासी बालाजी माधवराज पारसे हे परंडा तालुक्यातील कांदलगाव शिवारातील मधुकर सुखदेव चाैबे यांच्या शेतातील गट नं.११० मधील पालावर वास्तव्यास हाेते. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बालाजी पालावरच दारू पिला. यावेळी पत्नी मिनाबाई बालाजी पारसे यांना मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ‘‘तुला आज जीतं ठेवत नाही’’, असं म्हणत पाेहायला येत नसल्याची माहिती असतानाही मिनाबाई यांना बाजुच्या विहिरीत ढकलून दिले. यात त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना दुपारच्या सुमारास घडकीस आल्यानंतर परंडा ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी दाखल हाेत पंचनामा केला. यानंतर मयताची बहीण गोंडराज ज्ञानोबा टाळीकुटे यांनी परंडा ठाण्यात फिर्याद नाेंदविली. त्यावरून बालाजी पारसे याच्याविरूद्ध भादंविसंचे कलम ३०२, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.