‘किंग कोब्रा’ संघ ठरला स्पर्धेतील किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:31 AM2020-12-31T04:31:11+5:302020-12-31T04:31:11+5:30

(फोटो - बालाजी बिराजदार ३०) लोहारा : शहरातील किंग कोब्रा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात किंग ...

The ‘King Cobra’ team became the king of the tournament | ‘किंग कोब्रा’ संघ ठरला स्पर्धेतील किंग

‘किंग कोब्रा’ संघ ठरला स्पर्धेतील किंग

googlenewsNext

(फोटो - बालाजी बिराजदार ३०)

लोहारा : शहरातील किंग कोब्रा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात किंग कोब्रा क्रिकेट संघाने प्रथम पारितोषिक पटकाविले. औसा येथील अजय बॅटरीज संघ उपविजेता ठरला.

या स्पर्धेत ४२ संघानी सहभाग नोंदविला होता. अंतिम सामना मंगळवारी लोहारा हायस्कूलच्या मैदानावर किंग कोब्रा व औसा येथील अजय बॅटरीज या संघात झाला. या सामन्यात किंग कोब्रा संघाने विजय मिळवला. पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी अमिन सुंबेकर, रियाज खडीवाले, अस्लम खानापुरे, स्वप्निल माटे, नेताजी शिंदे, दीपक मुळे, गिरीश भगत, सुलेमान सौदागर यांची उपस्थिती होती. अंतिम सामन्यातील विजेत्या किंग कोब्रा संघांस १५ हजार व चषक, उपविजेत्या औसा संघास ११ हजार व चषक, तर तिसऱ्या विजेत्या लोहारा इंडियन्स संघास ७ हजार व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मालिकावीर म्हणून सुवन डोकडे, उत्कृष्ठ फलंदाज ऋषी आदटराव व बाला यांना विभागून देण्यात आले. उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून शुभम नेमके व भरत यांना विभागून, उत्कृष्ठ यष्टीरक्षक म्हणून सुनील शिंदे, सलग तीन विकेट लक्ष्मण शिवराय यांनाही वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.

पंच म्हणून गोपाळ सुतार, सचिन भोसले, भिमाशंकर डोकडे, प्रसाद जट्टे, सतीश ढगे, ईश्वर बिराजदार आदींनी काम पाहिले. स्पर्धेसाठी ओम पाटील, सतीश ढगे, गोपाळ सुतार, सुवन डोकडे,अनिल यल्लोरे, सुनील शिंदे, स्वप्निल स्वामी, शंभू स्वामी, गिरीश जट्टे, ईश्वर बिराजदार, परमेश्वर मुळे, राजपाल वाघमारे, चेतन पवार, मनोज लोहार, ओंकार जट्टे, मैनुदिन मोमीन, गौस मोमीन, अक्षय पवार, महेश चपळे आदी युवकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भिमाशंकर डोकडे यांनी केले.

Web Title: The ‘King Cobra’ team became the king of the tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.