आंदरूड येथे राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:39 AM2021-09-07T04:39:43+5:302021-09-07T04:39:43+5:30
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ४ सप्टेंबर रोजी आंदरूड गावात काेविड लसीकरण ठेवले हाेते. यावेळी ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी ...
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ४ सप्टेंबर रोजी आंदरूड गावात काेविड लसीकरण ठेवले हाेते. यावेळी ग्रामपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवृत्ती भरत तावरे व गावातील सतीश गोविंद लिमकर यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. याच वादाचा राग धरून ५ सप्टेंबर रोजी ५ वाजण्याच्या सुमारास सतीश गोविंद लिमकर, पवन सतीश लिमकर, रणजित सतीश लिमकर व गणेश राजेंद्र लिमकर अशा चाैघांनी मिळून तावरे यांच्या घरी जाऊन भांडण केले. यावेळी रणजित सतीश लिमकर याने निवृत्ती भरत तावरे यास चाकूने मारहाण केली. तर उर्वरित लोकांनी लोखंडी रॉडने भरत दत्तू तावरे यांना बेदम मारले. या घटनेत हे दोघेही जखमी झाले. त्यांना बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी निवृत्ती भरत तावरे यांनी दिलेल्या जबाबावरून वाशी पोलीस ठाण्यात संबंधित चाैघांविरुद्ध ३०७, ४५२, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेउपनि किशाेर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.काॅ. अच्युत कुठे, अशाेक करवर हे करीत आहेत.