घारगाव येथे मोबाईल लायब्ररी शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:57 AM2021-03-13T04:57:00+5:302021-03-13T04:57:00+5:30

जावळा नि. : परांडा तालुक्यातील घारगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ...

Launch of Mobile Library at Ghargaon | घारगाव येथे मोबाईल लायब्ररी शुभारंभ

घारगाव येथे मोबाईल लायब्ररी शुभारंभ

googlenewsNext

जावळा नि. : परांडा तालुक्यातील घारगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘एस फॉर स्कूल’ या पुणे येथील संस्थेच्या वतीने मोबाईल लायब्ररी सुरू करण्यात आली. याचे उद्‌घाटन गटशिक्षणाधिकारी अनिता जगदाळे-सुलतानपुरे यांच्या करण्यात आले.

वाचनालयाच्या माध्यमातून शब्द कोष वाढावा, अभ्यासात अधिक रुची निर्माण व्हावी यासाठी मावळ, इगतपुरी, वाडा आदी २५ तालुक्यात संस्थेच्या वतीने हा उपक्रम चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील घारगाव शाळेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून आतापर्यंत साडेतीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत संस्थेचे सदस्य पोहचले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदू लटकेहे तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख चंद्रकांत बेळे, विषयतज्ज्ञ अरविंद बाराते उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक सतीश गुरव, शशिकांत लटके, अमोल काळे, सचिन सुरवसे, सुमंत उमाप यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी सिकंदर तांबोळी, महेश इनामदार, गोविंद मोहरे यांनी पुढाकार घेतला.

कोट.....

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अवांतर वाचन आवश्यक आहे. यासाठी संस्थेने गोष्टी, कथा, चरित्रे, कॉमिक्स यांचा समावेश असणारी मराठी, इंग्रजी पुस्तके मोबाईल लायब्ररीत भेट दिली आहेत.

- चेतन परदेशी, सदस्य, एस फॉर स्कूल

फोटो कॅप्शन : परंडा तालुक्यातील घारगाव येथे मोबाईल लायब्ररीच्या उद्‌घाटन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी अनिता जगदाळे-सुलतानपुरे, केंद्रप्रमुख चंद्रकांत बेळे, अरविंद बाराते, सतीश गुरव आदी.

Web Title: Launch of Mobile Library at Ghargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.