पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेटच्या ‘यूपीआय क्यूआर कोड’चा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:49 AM2021-02-23T04:49:03+5:302021-02-23T04:49:03+5:30
उस्मानाबाद : येथील पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती व लोकनेते कै. भूपालसिंह उर्फ ...
उस्मानाबाद : येथील पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती व लोकनेते कै. भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त सभासद/खातेदार यांच्या सेवेत ‘यूपीआय क्यूआर कोड’ सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.
अध्यक्षस्थानी जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीकांत जाधव होते. प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धीकी मुखीम यांनी केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासून संस्था सभासदांना अद्ययावत सेवा-सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्याचबरोबर नव्याने सुरू करत असलेल्या ‘यूपीआय क्यूआर कोड’ सुविधेची माहिती दिली. सूत्रसंचलन दीपक साखरे यांनी केले. जनरल मॅनेजर प्रशांत सुलाखे यांनी आभार मानले.
यावेळी कॉटनकिंगचे बापू देशमुख, मॉडेला टेलरचे रझवी, जगदंब कलेक्शनचे आशिष घुटे, सी-मॉस सिस्टीमचे शेहबाज सिद्धीकी, गणेश जगदाळे, संतोष म्हेत्रे, संस्थेचे फंड विभाग प्रमुख अजित रोहिदास, ऑडिट विभाग प्रमुख फिरोज शेख, सोने तारण विभाग प्रमुख विश्वजित देशमुख यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
चौकट.......
शालेय साहित्य वाटप
पवनराजे निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त आळणी येथील स्वाधार मतिमंद मुलींच्या बालगृहात समर्थ स्पेसेस यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. श्रीकांत मुळे, मंगेश नायगावकर, दादासाहेब लामकाने, प्रवीण इंगळे, अंकित पवार, स्वाधारचे मुख्याध्यापक जी. ए. थोडसरे, एम. के. दासपवार, टी. डी. पोपळे, बी. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.