मोहा येथे हमीभाव हरभरा खरेदी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:28 AM2021-03-22T04:28:58+5:302021-03-22T04:28:58+5:30

मोहा : कळंब तालुक्यातील मोहा येथील देवीनंदा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन शिवसेना ...

Launched Guaranteed Gram Shopping Center at Moha | मोहा येथे हमीभाव हरभरा खरेदी केंद्र सुरू

मोहा येथे हमीभाव हरभरा खरेदी केंद्र सुरू

googlenewsNext

मोहा : कळंब तालुक्यातील मोहा येथील देवीनंदा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे व आतिश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

मोहा परिसरामध्ये रबी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याचे पीक घेतले जाते. सध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू असून, व्यापाऱ्याकडून ४ हजार ७०० रुपयांच्या आसपास हरभरा खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत असून, मोहामध्ये शासकीय हमीभाव केंद्र सुरू झाल्याने, मोहा व मोहा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. उद्‌घाटन प्रसंगी मोहेकर मल्टिस्टेटचे चेअरमन हनुमंत मडके, सरपंच राजू झोरी, उपसरपंच सोमनाथ मडके, बाबासाहेब मडके, माजी सरपंच बाबा मडके, गुणवंत मडके, उद्धव मडके, पंकज पाटील, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर श्रीराम मडके व गौड, व्यंकटराव पवार, आकाश शिंदे, प्रशांत मडके, संताजी वीर, जितेंद्र कसबे, रामकिसन मडके, सलीम मोमीन, सुदाम मडके, भैरवनाथ किसान प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन राजाभाऊ तिबोले, देवीदास मडके, तसेच संचालक व शेतकरी उपस्थित होते.

चौकट......

नाव नोंदणीची मोफत सोय

शेतकऱ्यांना हरभऱ्याची नोंद ऑनलाइन करण्यासाठी केंद्र चालकाकडून विनामूल्य सोय केली आहे. शेतकऱ्याकडून हरभरा खरेदी केल्यानंतर जास्तीतजास्त तीन दिवसांमध्ये त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा प्रयत्न राहील, असे देवीनंदा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन अतुल मडके यांनी सांगितले.

Web Title: Launched Guaranteed Gram Shopping Center at Moha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.