ऑक्सिजन सोडा, साधा जनरेटरही नाही, केअर सेंटरमध्ये रुग्ण घामाघूम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:24 AM2021-04-29T04:24:05+5:302021-04-29T04:24:05+5:30

मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. क्रिटिकल ...

Leave oxygen, not even a simple generator, patient sweating in the care center! | ऑक्सिजन सोडा, साधा जनरेटरही नाही, केअर सेंटरमध्ये रुग्ण घामाघूम !

ऑक्सिजन सोडा, साधा जनरेटरही नाही, केअर सेंटरमध्ये रुग्ण घामाघूम !

googlenewsNext

मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. क्रिटिकल रुग्णांकरिता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, तर मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्यात आली आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर सुरू कण्यात आली आहेत. ज्या रुग्णांना घरी स्वतंत्र रूम व टॉयलेटची व्यवस्था नाही, अशा रुग्णांनाही कोविड केअर सेंटरमध्ये १० दिवस ठेवले जात आहे. या केंद्रातील रुग्णांना सकाळी नाष्टा, दोन वेळेस जेवण तसेच औषधेही वेळेवर दिली जात आहेत. रुग्णांच्या चेकअपसाठी डॉक्टरही वेळेवर राऊंड घेत असतात. मात्र, बहुतांश कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था तर नाहीच, साधा जनरेटरही नाही. त्यामुळे उकाड्याच्या दिवसांत रुग्णांसह कोविड कर्मचारी घामाघूम होत आहेत.

एप्रिल तापला

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. त्यासोबतच तापमानातही वाढ होत आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पारा ३८ अंशांच्या पुढे सरकला होता.

एप्रिल महिना उजाडताच सूर्यनारायण आग ओकू लागला असून, तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे असह्य उकाडा वाढला आहे.

कोरोनापेक्षा उकाड्याचा त्रास

कोविड सेंटरमध्ये नाष्टा, जेवण, औषधे वेळेवर मिळत आहेत. डॉक्टरही तपासणीस येतात. मात्र, सध्या उकाडा वाढत आहे. त्यातच सतत वीज जात आहे. त्यामुळे अंगाचे पाणी पाणी होत आहे.

कोविड रुग्ण

कोविड केअर सेंटरमध्ये दोन दिवस झाले दाखल झालो आहे. या ठिकाणी डॉक्टर राऊंडला येतात. नाष्टा व जेवणही दिले जाते. ऑक्सिजन, तापमान तपासणी करण्यात येत आहे. केंद्रात जनरेटरची सोय नाही. त्यातच सध्या अधूनमधून वीज जात आहे. त्यामुळे उकाड्याने घामाघूम होत आहोत. त्यामुळे केंद्रात जनरेटर व कुलरची व्यवस्था करावी.

कोविड रुग्ण

पॉईंटर..

३५

एकूण कोविड केअर सेंटर्स

२६००

दाखल पॉझिटिव्ह रुग्ण

Web Title: Leave oxygen, not even a simple generator, patient sweating in the care center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.