एफपीओ फेडरेशन सदस्यांसाठी व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:39 AM2021-02-17T04:39:07+5:302021-02-17T04:39:07+5:30

उस्मानाबाद : महाॲग्री एफपीओ फेडरेशनच्या वतीने येथे उद्योजक हनुमंतराव गायकवाड यांचे ‘शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी व्यवसायाच्या संधी’ या विषयावर व्याख्यान ...

Lecture for FPO Federation Members | एफपीओ फेडरेशन सदस्यांसाठी व्याख्यान

एफपीओ फेडरेशन सदस्यांसाठी व्याख्यान

googlenewsNext

उस्मानाबाद : महाॲग्री एफपीओ फेडरेशनच्या वतीने येथे उद्योजक हनुमंतराव गायकवाड यांचे ‘शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी व्यवसायाच्या संधी’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी आमदार कैलास पाटील होते. यावेळी एफपीओ फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संदीप तांबारे, प्रा. तुषार वाघमारे, रवी गाडे, संजय शिंदे, जिल्हाध्यक्ष अशोक लांडगे, प्रताप देशमुख, सयाजी शेळके, रवी शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी बोलताना हनुमंतराव गायकवाड यांनी एफपीओसोबत मिळून काम करत शेतकऱ्याचा शेतीवरील खर्च अर्ध्यावर आणत उत्पन्न व गुणवत्ता यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. आ. कैलास पाटील यांनी शेती व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकरी कंपन्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. प्रस्ताविक डॉ. संदीप तांबरे, सूत्रसंचालन प्रा. तुषार वाघमारे यांनी केले. आभार अशोक लांडगे यांनी मानले.

Web Title: Lecture for FPO Federation Members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.