कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी बारामतीत आंदोलन करू : चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:30 AM2021-07-26T04:30:02+5:302021-07-26T04:30:02+5:30
पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात नामदेव चव्हाण यांनी वाशी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कम्युनिस्ट पक्षाचे ...
पारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात नामदेव चव्हाण यांनी वाशी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी तुकाराम भस्मे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सरपंच महेश कोळी, उपसरपंच पंकज चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. चव्हाण म्हणाले, विजयसिंह मोहिते - पाटील ग्रामविकास मंत्री असताना जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेत १० टक्के जागा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. यामधून राज्यभरात आजपर्यंत पंधरा हजार कर्मचारी सेवेत रूजू झाले. सध्या ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या किमान वेतनाचा प्रश्न प्रलंबित असून, या अनुषंगाने शासनाने परिमंडलानुसार किमान वेतन निश्चित करून त्यासंबंधी अधिसूचना काढली आहे. त्यावर अर्थखात्याची मंजुरी मिळावी म्हणून ग्रामविकास विभागाने ती फाईल अर्थमंत्र्यांकडे पाठविली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ कोळी, सुशांत कोकणे, लाखनगावचे बाळासाहेब गिरी, एकनाथ लाखे, सुभाष सुतार, समाधान मोटे, मनोज औताने, ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर फरताडे, चंद्रशेखर काशीद, श्रीकांत जगताप, राहुल डोके, दिनकर जोगदंड, संभाजी चव्हाण, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.