रोटरीच्या वतीने गावागावात ग्रंथालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:32 AM2021-04-25T04:32:24+5:302021-04-25T04:32:24+5:30

गुंजोटी : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लाॅकडाऊन काळात पुस्तकांशी मैत्री व्हावी, वाचन संस्कृती वाढावी, मुलांचे, युवकांचे मनोधैर्य वाढावे रोटरी क्लबच्या ...

Libraries in villages on behalf of Rotary | रोटरीच्या वतीने गावागावात ग्रंथालय

रोटरीच्या वतीने गावागावात ग्रंथालय

googlenewsNext

गुंजोटी : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लाॅकडाऊन काळात पुस्तकांशी मैत्री व्हावी, वाचन संस्कृती वाढावी, मुलांचे, युवकांचे मनोधैर्य वाढावे रोटरी क्लबच्या वतीने गावागावात ‘रोटरी ग्रंथालय’ सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सध्या पुस्तक संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे. या ग्रंथालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असणारी ग्रंथ-कादंबरी, तसेच महाविद्यालयीन आणि युवकांसाठी प्रेरणा व प्रोत्साहन देणारी पुस्तके आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी असणारी शालेय अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध केली जाणार आहेत. दरम्यान, या उपक्रमासाठी रोटरी क्लबचे हरिप्रसाद चांडक आणि उज्वला चांडक, रोटरीचे डॉ. राजकुमार कानडे, डॉ. शशिकांत मुळे, रोटरीचे डायरेक्टर डॉ. विनोद देवरकर, वसुधा देवकर या दाम्पत्यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपल्याकडील असलेली पुस्तके रोटरी ग्रंथालय या योजनेसाठी अध्यक्षा कविता अस्वले आणि क्लब ट्रेनर डॉ. संजय अस्वले यांच्याकडे नुकतीच सुपूर्द केली.

Web Title: Libraries in villages on behalf of Rotary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.