लायसनची मुदत संपली! अपॉईन्टमेंट घेतली का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:39+5:302021-06-11T04:22:39+5:30
उस्मानाबाद : अनलॉक झाल्यानंतर लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी गर्दी वाढली आहे; मात्र लायसन्स नूतनीकरणासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी घेतली ...
उस्मानाबाद : अनलॉक झाल्यानंतर लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी गर्दी वाढली आहे; मात्र लायसन्स नूतनीकरणासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी घेतली असेल तरच नूतनीकरण केले जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांनाच घरी थांबायला भाग पाडले
आता काही अंशी निर्बंध उठवण्यात आल्याने मागील दोन महिन्यांपासून रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्याचप्रमाणे अनेक जण वाहन लायसन्स नूतनीकरण करू शकले नव्हते. त्यासाठी आरटीओ कार्यालयात नागरिकांची गर्दी होत आहे; पण लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असून, ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन आरटीओ कार्यालयाने केले आहे.
कोरोना अजून पूर्णपणे संपलेला नाही, यासाठी अशी खबरदारी घेण्यात येत आहे. गर्दी वाढली तर पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे टप्प्याटप्प्याने नागरिकांना तारीख दिली जात आहे. त्या तारखेला लायसन्ससाठी पुढील प्रक्रिया राबविली जात आहे.
अशी घ्या अपॉईन्टमेंट
लायसन्सची मुदत संपली असेल तर नूतनीकरण करण्यासाठी आता परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. कागदपत्रे अपलोड करावी लागतील व ज्यादिवशी बोलावले जाईल तेव्हा कार्यालयात जावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी कार्यालयाकडून खबरदारी घेतली जात आहे.
असा आहे कोटा
कोरोना संसर्गामुळे कोटा कमी करण्यात आला आहे. पूर्वी दिवसाकाठी ९० परमनन्ट लायसन्सच्या टेस्ट होत असत. तर लर्निंगच्याही ९० टेस्ट केल्या जात; मात्र सध्या कोटा ५० टक्के करण्यात आला असल्याने दोन्ही टेस्ट प्रत्येकी ४५ होत आहेत.
मे महिन्यात ३५५ वाहनांची नोंदणी
लॉकडाऊन काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य परिवहन विभागाने ऑनलाइन पद्धतीने वाहनांची नोंदणी केली जात होती. कार्यालयाच्या ई-मेलद्वारे नोंदणी केल्यानंतर केली जात होती. महिन्याभरात ३५५ जणांनी नोंदणी केली होती. सध्या वाहनधारकांना वाहन सोबत आणावे लागत आहे.
कोट...
लायसन्सच्या नूतनीकरणासाठी प्रथम ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे बंधनकारक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी थेट संपर्क टाळता यावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. वाहनधारकांनाही स्वत:च्या अपॉईन्मेंट रिशेड्युल करून घेता येत आहेत. कार्यालयाकडून दोन दिवसांनंतर अपॉईन्मेंट रिशेड्युल करण्यात येणार आहेत.
गजानन नेरपगार, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी.