एकाच कुटुंबातील ६ जणांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:49 AM2018-05-15T05:49:33+5:302018-05-15T05:49:42+5:30
सामाईक विहिरीचे पाणी घेण्यावरून उमरगा तालुक्यातील दाबका येथे झालेल्या खूनप्रकरणी सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ बी़ साळुंखे यांनी एकाच कुटुंबातील सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
उस्मानाबाद / उमरगा : सामाईक विहिरीचे पाणी घेण्यावरून उमरगा तालुक्यातील दाबका येथे झालेल्या खूनप्रकरणी सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़ बी़ साळुंखे यांनी एकाच कुटुंबातील सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
दाबका येथील जमादार कुटुंबियांत सामाईक विहिरीच्या पाण्यावरून निर्माण झालेल्या वादातून ८ जानेवारी २०१४ रोजी माणिक जमादार व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्याशी आरोपी दत्ता जमादार याने हुज्जत घातली़ यानंतर माणिक यांना दत्ता जमादार तसेच मनोहर जमादार, बालाजी जमादार, दिगंबर जमादार, विमलबाई जमादार व अनुसया घाटे यांनी मारहाण केली़ लक्ष्मीबाईमध्ये पडल्या असता त्यांनाही काठीने डोक्यात मारून जखमी केले. यानंतर दिगंबरने कुºहाडीने डोक्यात, तर दत्ताने चाकूने पोटात वार करून माणिक यांचा खून केला होता. या प्रकरणातील सहाही आरोपींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी ३ हजारांचा दंड सुनावला.