राहतात उस्मानाबादेत, लायसन्स काढले परदेशाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:22 AM2021-07-10T04:22:41+5:302021-07-10T04:22:41+5:30

उस्मानाबाद : परदेशात दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविण्यासाठी जिल्ह्यातील काही रविवाशांनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स आयडीपी काढले आहे. गत दहा ...

Lives in Osmanabad, licensed abroad | राहतात उस्मानाबादेत, लायसन्स काढले परदेशाचे

राहतात उस्मानाबादेत, लायसन्स काढले परदेशाचे

googlenewsNext

उस्मानाबाद : परदेशात दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविण्यासाठी जिल्ह्यातील काही रविवाशांनी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स आयडीपी काढले आहे. गत दहा वर्षांच्या आकडेवारीवर नजर घातल्यास जिल्ह्यातील ६६ जणांनी आयडीपी काढले असून, राहतात उस्मानाबादेत आणि लायसन्स काढले परदेशाचे असे म्हणण्याची वेळ आली आहे.

इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स या परवान्याची मुदत फक्त १ वर्षासाठी असते. भारताबाहेर परदेशात वाहन चालविण्यासाठी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यावश्यक बाब आहे. याशिवाय परदेशात वाहन चालविणे म्हणजे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. गत दशकभराच्या आकडेवारीवर नजर घातल्यास जिल्ह्यातील ६६ नागरिकांनी इंटरनॅशनल लर्निंग लायसन्स काढले आहे. २०११ मध्ये चार, २०१२ मध्ये दहा, २०१३ मध्ये पाच, तर २०१४ मध्ये सात, २०१५ मध्ये आठ, २०१६ मध्ये दहा, २०१७ व २०१८ मध्ये प्रत्येकी तीन जणांनी, २०१९ मध्ये नऊ, २०२० मध्ये पाच व्यक्तींनी तर चालू वर्षात दोघांनी आयडीपी काढले आहे.

१ वर्षाची मुदत

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत फक्त १ वर्षभरासाठी असते. याचा उपयोग अनेक देशांमध्ये ओळख पटविण्यासाठी केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स हा पुरावा आहे की एखाद्या व्यक्तीने ज्या देशात तो जारी केला होता त्या वाहनचालकाचा वैध परवाना आहे. तसेच ती व्यक्ती परदेशात वाहन चालवू शकते हेदेखील प्रमाणित होत असते.

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्समध्ये मुद्रित एकाधिक भाषा इतर देशांच्या अधिधारकांची माहिती सत्यापित करण्यास उपयुक्त ठरतात. वाहन चालविण्यास मदत होते.

तुम्हाला काढायचे इंटरनॅशनल लायसन्स?

भारतात घरगुती रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी परवान्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया खूप सामान्य आहे. यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करावा लागेल. यानंतर आपल्याला लेखी परीक्षा आणि ड्रायव्हिंग चाचणी द्यावी लागते. सहा महिन्यांसाठी लर्निंग लायसन्स प्रदान करण्यात येते. या कालावधीत वाहन चालवायला शिकून आपल्याला कायम परवान्यासाठी अर्ज करावा लागतो. आंतरराष्ट्रीय वाहन परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेतून जावे लागते. त्यानंतर त्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो.

पॉइंटर

कोणत्या वर्षी किती लायसन्स

२०११ ४

२०१२ १०

२०१३ ५

२०१४ ७

२०१५ ८

२०१६ १०

२०१७ ३

२०१८ ३

२०१९ ९

२०२० ५

२०२१ जून अखेर २

कोट...

इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी एक प्रक्रिया अवलंबली जाते. मागील दहा वर्षांत जिल्ह्यात ६६ जणांनी आयपीडी काढले आहे. आयपीडीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अर्जासोबत जोडून शुल्काचा भरणा करून लायसन्स प्राप्त करता येते. नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

गजानन नेरपगार,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Lives in Osmanabad, licensed abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.