Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादेत प्रतिज्ञापत्र पूर्ण न भरल्याने तिघांचे पाच उमेदवारी अर्ज अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 01:16 PM2019-03-27T13:16:47+5:302019-03-27T13:19:30+5:30

प्रमुख उमेदवारांसह अपक्ष २० उमेदवारांचे ३३ अर्ज वैध ठरले आहेत़  

Lok Sabha Election 2019: Three candidates five forms rejected due to incomplete information in Osmanabad | Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादेत प्रतिज्ञापत्र पूर्ण न भरल्याने तिघांचे पाच उमेदवारी अर्ज अवैध

Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादेत प्रतिज्ञापत्र पूर्ण न भरल्याने तिघांचे पाच उमेदवारी अर्ज अवैध

googlenewsNext

उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या अर्जांची बुधवारी सकाळी छाननी करण्यात आली़ यात ३८ अर्जांपैकी केवळ ५ अर्ज अवैध ठरले आहेत़ 

उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणा-या २३ जणांनी मंगळवारपर्यंत ३८ अर्ज दाखल केले होते़ या अर्जांची बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी करण्यात आली़ त्यात मनोहर पाटील, लिंबाजी राठोड, विष्णु देडे या अपक्ष उमेदवारांचे ५ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत़ अन्य प्रमुख उमेदवारांसह अपक्ष २० उमेदवारांचे ३३ अर्ज वैध ठरले आहेत़  

यात प्रामुख्याने महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील, महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे प्रत्येकी ४ अर्ज, वंचित बहुजन आघाडीचे अर्जून सलगर यांचे २, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील यांचे ३, खासदार रवी गायकवाड समर्थक माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे यांनी बंड करीत भरलेला व बसपाचे डॉ़शिवाजी ओमन यांच्या १ अर्जाचा समावेश आहे़ २९ मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे़ या कालावधीत कोण-कोण माघार घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़ 

यामुळे ठरले अर्ज अवैध़
अर्ज अवैध ठरलेल्या तीन उमेदवारांनी आपले प्रतिज्ञापूर्ण पूर्णपणे व आवश्यक माहिती न भरल्यामुळे अवैध ठरले आहेत़ काहींच्या प्रतिज्ञापत्रावर सूचकांच्या नावांसमोर स्वाक्षरी नसल्यानेही अर्ज अवैध ठरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़

Web Title: Lok Sabha Election 2019: Three candidates five forms rejected due to incomplete information in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.