‘संविधान बचाव’ साठी उस्मानाबादेत महा मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:41 PM2019-12-26T17:41:30+5:302019-12-26T17:44:23+5:30

अतिशय शांततापूर्ण वातावरणात निघालेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते़ 

Maha Mukmorcha in Osmanabad for 'Defense of the Constitution' | ‘संविधान बचाव’ साठी उस्मानाबादेत महा मूकमोर्चा

‘संविधान बचाव’ साठी उस्मानाबादेत महा मूकमोर्चा

googlenewsNext

उस्मानाबाद : केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मुस्लिम बांधवांच्या वतीने  जिल्हाकचेरीवर गुरुवारी ‘संविधान बचाव’ महा मूकमोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला़ अतिशय शांततापूर्ण वातावरणात निघालेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते़ 

केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरिकता नोंदणी एनआरसी व नागरिकत्व दुरुस्ती कायदा सीएए मंजूर केल्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने मोर्चे निघत आहेत़ त्याच अनुषंगाने उस्मानाबाद शहरात गुरुवारी मोर्चाचे आयोजन केले होते़ या मोर्चास मुस्लीम समाजाच्या विविध संघटनांसह परिवर्तनवादी संघटनांनी पाठिंबा दर्शवित मोर्चात सहभाग नोंदविला़ सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील गाजी मैदानातून मोर्चास प्रारंभ झाला़ मदीना चौक, शम्स चौक, देशपांडे स्टॅण्ड, भारत टॉकीज, ताजमहल टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास धडकला़ मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालापाशी दाखल होताच मोर्चाचे सभेत रुपांतर झाले़ यावेळी विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाºयांनी आपले मनोगते व्यक्त करित या कायद्यास विरोध दर्शविला़ 

गुलाब देवून केले पोलिसांचे स्वागत
शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता़ यावेळी मोर्चेकºयांनी बंदोबस्ताच्या ठिकाणी असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचा-यांना गुलाब पुष्प देवून स्वागत केले़

Web Title: Maha Mukmorcha in Osmanabad for 'Defense of the Constitution'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.