उस्मानाबादेत मुस्लिम समाजाचा महा- मुकमोर्चा
By Admin | Published: January 5, 2017 09:12 PM2017-01-05T21:12:24+5:302017-01-05T21:13:04+5:30
मुस्लिम समाजाला शिक्षण, नोकरीत विविध समित्यांनी सूचविल्यानुसार आरक्षण लागू करावे, मुस्लिम शरियत कायद्यामध्ये कोणीही
ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. 5 -मुस्लिम समाजाला शिक्षण, नोकरीत विविध समित्यांनी सूचविल्यानुसार आरक्षण लागू करावे, मुस्लिम शरियत कायद्यामध्ये कोणीही हस्तक्षेप, ढवळाढवळ करू नये यासह इतर जवळपास नऊ मागण्यांसाठी मुस्लिम आरक्षण महा- मूक मोर्चा समितीच्यावतीने आज उस्मानाबादेत शिस्तबध्द मोर्चा काढण्यात आला़ शहरातील गाझी मैदावरून निघालेल्या या मुक मोर्चात लाखोच्या संख्येने मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते.
मुस्लिम आरक्षण महा- मुक मोर्चा समितीच्या वतीने मागील महिनाभरापासून मुक मोर्चाची तयारी करण्यात आली होती़ आज दुपारी १२़३० वाजता गाझी मैदानावरून मुक मोर्चा निघणार असल्याने सकाळपासूनच शहर परिसरासह जिल्हाभरातील मुस्लिम बांधवांनी उस्मानाबादेत येण्यास सुरूवात केली होती़ सकाळपासूनच गाझी मैदान परिसरात गर्दी होण्यास सुरूवात झाली होती़ दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रगिताने मुक मोर्चास प्रारंभ झाला़ हा मूकमोर्चा गाजी मैदान येथे राष्ट्रगिताने महा- मुकमोर्चास प्रारंभ झाला़ मोर्चाच्या प्रारंभीच्या टप्प्यात पांढरा ड्रेस व डोक्यावर भगव्या, पांढऱ्या, हिरव्या रंगाच्या टोप्या घातलेल्या युवकांनी तिरंगा तयार केला होता़ त्यापाठोपाठ विविध मागण्यांचे फलक हातात घेवून लाखोंचा जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गाने निघाला़ हा मूकमोर्चा मदिना चौक, शम्स चौक, अक्सा चौक, देशपांडे स्टँन्ड, ताजमहल टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ जिल्हाधिकारी कार्यालयात लहान मुलांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ त्यानंतर लहान मुलांनी निवेदनाचे वाचन केले व प्रार्थनेने मोर्चाची सांगता झाली़ मोर्चाच्या दरम्यान विविध संघटनांच्या वतीने मोर्चेकऱ्यांसाठी पाणी, नाष्ट्याची सोय करण्यात आली होती़ मोर्चात सहभागी मुस्लिम बांधवांनी शांततेत आणि शिस्तबध्द पध्दतीने महा-मुक मोर्चा यशस्वी केला़ तर ठिकठिकाणी मोर्चेकऱ्यांसाठी पाण्यासह अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.