श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा

By बाबुराव चव्हाण | Published: October 22, 2023 04:30 PM2023-10-22T16:30:39+5:302023-10-22T16:30:56+5:30

धाराशिव : शारदीय नवरात्र महोत्सवात रविवारी दुर्गाष्टमी दिवशी श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. आई राजा ...

Mahishasur Mardini Alankar Mahapuja of Sri Tuljabhavani Devi | श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा

श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा

धाराशिव : शारदीय नवरात्र महोत्सवात रविवारी दुर्गाष्टमी दिवशी श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. आई राजा उदे-उदेचा गजर करीत भाविकांनी महापूजेचे दर्शन घेतले.

श्री तुळजाभवानीची २२ ऑक्टोबर रोजी नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला. त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेली श्री तुळजाभवानी देवी सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे.

हिने सर्व दैत्यांचा राजा महिषासुराचा वध केला व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते. तत्पूर्वी शनिवारी रात्री सातव्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आले. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात पितळी गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.

Web Title: Mahishasur Mardini Alankar Mahapuja of Sri Tuljabhavani Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.