कंत्राटी तत्त्वावरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कायम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:10 AM2021-09-02T05:10:05+5:302021-09-02T05:10:05+5:30

कळंब : कंत्राटी तत्त्वावर नियुक्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कायम करण्यात याव्यात, अशी मागणी बुधवारी कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ ...

Maintain contract staff appointments | कंत्राटी तत्त्वावरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कायम करा

कंत्राटी तत्त्वावरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कायम करा

googlenewsNext

कळंब : कंत्राटी तत्त्वावर नियुक्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कायम करण्यात याव्यात, अशी मागणी बुधवारी कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्याकडे करण्यात आली. आगामी काळामध्ये कोरोनाची संभाव्य तिसरी लाट असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. अशात कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयांतर्गत कार्यरत असलेल्या २१ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने काेविड-१९ मध्ये सेवा देणाऱ्या कंत्राटी मनुष्यविकास निधी मंजूर केला नाही. त्यामुळे ते कंत्राटी कर्मचारी कमी करण्याचे पत्र राज्याचे आरोग्य सेवा विभागाच्या आयुक्तांनी काढले आहे. कळंब उपजिल्हा रुग्णालयातील ५ वैद्यकीय अधिकारी, १० स्टाफ नर्स, १ औषध निर्माते, १ टेक्निशियन, १ डाटा ऑपरेटर, तीन साफसफाई कर्मचारी असे तब्बल २१ कर्मचारी कार्यमुक्त होणार आहेत. सध्या ७ नर्सेसवरच उपजिल्हा रुग्णालय व कोविड उपचार केंद्राचा कारभार चालू आहे. अशात आगामी काळात तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. जर तिसरी लाट आली तर कळंब उपजिल्हा रुग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये कर्मचारी संख्या अपुरी पडणार आहे. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कार्यमुक्त करण्यात येणाऱ्या २१ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कायम कराव्या, या मागणीचे पत्र उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर ऑक्सिजन ग्रुपचे सदस्य सुशील तीर्थकर, हर्षद अंबुरे, अकीब पटेल, सुमित बलदोटा, विजय पारवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Maintain contract staff appointments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.