एकाच अधिकाऱ्यावर पशुधन विभागाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:05+5:302021-07-28T04:34:05+5:30

चौकट..... एकाच अधिकाऱ्यांवर पाणीपुरवठा विभाग ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या पाइपलाइन, नवीन विहीर घेऊन पाणीपुरवठा करणे आदी कामे पंचायत समितींतर्गत ग्रामीण ...

Management of Livestock Department on a single officer | एकाच अधिकाऱ्यावर पशुधन विभागाचा कारभार

एकाच अधिकाऱ्यावर पशुधन विभागाचा कारभार

googlenewsNext

चौकट.....

एकाच अधिकाऱ्यांवर पाणीपुरवठा विभाग

ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या पाइपलाइन, नवीन विहीर घेऊन पाणीपुरवठा करणे आदी कामे पंचायत समितींतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागामार्फत केली जातात. परंतु, या विभागाचा कारभारदेखील एकाच शाखा अभियंत्यांवर सुरू आहे. शाखा अभियंत्यांची सहा पदे मंजूर असताना यातील पाच पदे रिक्त असल्याने अनेक कामे संथ गतीने सुरू आहेत.

आरोग्य विभागही सलाइनवर...

तालुक्यात अजूनही कोरोनाची दहशत कायम आहे. त्यामुळे प्रशासनावर विशेषतः आरोग्य विभागावर कामाचा मोठा ताण आहे. पंचायत समितीमार्फत चालणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवरही मोठी जबाबदारी आहे. परंतु, या केंद्रातही अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागात वेळेवर उपचार देताना उपलब्ध अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सद्य:स्थितीत आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यक १, वैद्यकीय अधिकारी ५, औषध निर्माता ३, स्वास्थ्य अभ्यंगता ३, आरोग्य सहाय्यक २, आरोग्यसेवक १०, आरोग्यसेविका १०, कुष्ठरोग तंत्रज्ञ ५, तर कनिष्ठ सहाय्यकांची दोन पदे रिक्त आहेत. याशिवाय, वाहन - चालक आणि सफाई कामगार यांची मंजूर असलेली सर्वच्या सर्व प्रत्येकी पाच तर परिचारकांची २६ पैकी १२ पदे रिक्त आहेत.

Web Title: Management of Livestock Department on a single officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.