मंडळांनी एक गाव, एक गणपती संकल्पना राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:33 AM2021-09-03T04:33:58+5:302021-09-03T04:33:58+5:30
तामलवाडी : कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, हा संसर्ग ग्रामीण भागात वाढू नये यासाठी स्थानिक गणेश मंडळांनी एकत्रितरित्या गावामध्ये ...
तामलवाडी : कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, हा संसर्ग ग्रामीण भागात वाढू नये यासाठी स्थानिक गणेश मंडळांनी एकत्रितरित्या गावामध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी केले आहे.
तुळजापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायत कार्यालयात तामलवाडी पोलीस ठाण्याच्यावतीने गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. यावेळी सरपंच आदेश काेळी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, बाबू मियाॅं काझी यांची प्रमुख उपस्थिती हाेती. काटी हे १२ ते १५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे १० ते १२ गणेश मंडळे असून दरवर्षी प्रत्येक मंडळ स्वतंत्ररित्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करते. परंतु, यंदा नेहमीप्रमाणे परिस्थिती नाही. काेराेनाचा संसर्ग काहीअंशी कमी झाला असला तरी धाेका टळलेला नाही. तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदा एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबवावी, असे आवाहन तामलवाडी ठाण्याकडून करण्यात आले हाेते. त्यास सर्वच मंडळांनी अनुमती दर्शविली. बैठकीला पोलीस पाटील जांबुवंत म्हेत्रे, करीम बेग, माजी सैनिक श्रीकांत गाटे, रामेश्वर लाडूळकर, जितेद्र गुंड, मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, अनिल बनसोडे, सुहास साळुके, भैरी काळे, अविनाश वाडका, नजीब काझी, दत्तात्रय हंगरकर, वाचक शाखेचे आकाश सुरनर आदींची उपस्थिती हाेती.
चौकट
पोलीस प्रशासनाला सहकार्य
काटी हे घाटाखालील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते. कधी नव्हे ते गणेश मंडळांनी एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ एकाच मूर्तीची स्थापना करून गणेशाेत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. उत्सवादरम्यान रक्तदान शिबिरासारखे विधायक उपक्रम राबविले जाणार आहेत.
-विक्रमसिंह देशमुख, सोसायटी चेअरमन.