Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उस्मानाबाद येथे तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 05:28 PM2018-08-02T17:28:24+5:302018-08-02T18:14:55+5:30
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कळंब तालुक्यातील देवळाली येथील तृष्णा तानाजी माने (१९) या तरुणीने दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन केले होते. उपचार दरम्यान बुधवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
कळंब ( उस्मानाबाद) : मराठा आरक्षणासाठी कळंब तालुक्यातील देवळाली येथील तृष्णा तानाजी माने (१९) या तरुणीने दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन केले होते. उपचार दरम्यान बुधवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
आज देवळाली ग्रामस्थांनी शासन मराठा आरक्षणप्रश्नी दुर्लक्ष करीत असल्याने तरुणीने हे पाऊल उचलल्याचा आरोप करत तिचा अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, महसूल व पोलीस विभागााच्या अधिकाऱ्यांनी समजूत काढून त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मयत तृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले़
दरम्यान, तृष्णाचे वडील तानाजी माने यांनी पोलिसांकडे दिलेल्या जबाबात मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने शिकूनही उपयोग नाही, असे सांगत तृष्णाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे.