मराठा समाज आक्रमक, सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
By बाबुराव चव्हाण | Published: September 12, 2023 03:39 PM2023-09-12T15:39:41+5:302023-09-12T15:40:42+5:30
ही अंत्ययात्रा गावातील मुख्य चाैकात दाखल झाल्यानंतर प्रतिकात्मक चितेला भडाग्नी देण्यात आला.
खामसवाडी (जि. धाराशिव)- कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील मराठा समाजाने मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली. जाेरदार घाेषणाबाजी करीत सकाळी गावातून राज्य सरकारी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खामसवाडीत मागील सहा दिवसांपासून रमेश साहेबराव शेळके यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. असे असतानाही मराठा आरक्षण मागणीबाबत सरकारकडून ठाेस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त समाजबांधवांनी मंगळवारी राज्य सरकारची गावातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. दरम्यान, ही अंत्ययात्रा गावातील मुख्य चाैकात दाखल झाल्यानंतर प्रतिकात्मक चितेला भडाग्नी देण्यात आला. यावेळी संतप्त तरूणांनी ‘‘एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, काेण म्हणतं देत नाही, गेतल्याशिवाय राहात नाही’’, अशा जाेरदार घाेषणा दिल्या. आता तरी सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणीही यावेळी लावून धरली.