मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:58+5:302021-07-27T04:33:58+5:30
उस्मानाबाद : कोरोना नियमांचे काटेकोर पालन म्हणून घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावले जात आहे. दुसरीकडे मास्कमुळे त्वचेला खाज सुटण्याचा ...
उस्मानाबाद : कोरोना नियमांचे काटेकोर पालन म्हणून घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावले जात आहे. दुसरीकडे मास्कमुळे त्वचेला खाज सुटण्याचा काही व्यक्तींना त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या बचावासाठी मास्क आवश्यक आहे, परंतु मास्क वापरताना काळजी घ्यावी लागते. सर्जिकल मास्क एकच वेळेस वापरावा.
मास्क आवश्यक, पण असे करा त्वचेचे रक्षण...
सर्वप्रथम श्वास घेता यावा, असा मास्क वापरणे आवश्यक आहे. एन-९५ मास्क वापरला तर उत्तम आहे. हा मास्कही तीन ते चार दिवस वापरावा. कापडी मास्कही फार घट्ट बांधू नये, कपड्याचा मास्क नियमितपणे स्वच्छ धुऊन वापरावा.
त्वचाविकाराचे रुग्ण वाढले
कोरोना काळात मास्कचा अधिक वापर वाढला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. एकच मास्क वारंवार वापरू नये, एन ९५ मास्कही तीन ते चार वेळेस वापरावा.
डॉ.सुजितकुमार रणदिवे, त्वचाविकार तज्ज्ञ
एकच कापडी मास्क वारंवार वापरल्याने, घामामुळे माॅइश्चर येऊन खाज सुटते. कापडी मास्कचा दोन दिवस वापर करावा. त्यानंतर, तो धुऊन वापरणे गरजचे आहे.
डॉ.आर.के. शेख, त्वचाविकार तज्ज्ञ
सॅनिटायझरपेक्षा साबण बरा
सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते. त्यामुळे हाताचे कातडे जात आहे, तसेच त्वचा कोरडी पडत आहे.
कोणत्याही पद्धतीने हात स्वच्छ धुवणे गरजचे आहे. त्यासाठी साबण वापरू शकता.
साबण, हॅण्डवॉशचा वापर करूनही हात स्वच्छ ठेवून सुरक्षित राहू शकता.