व्यापारी महासंघाकडून आराेग्य कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:52+5:302021-05-13T04:32:52+5:30
येथील व्यापारी महासंघाच्या वतीने जागतिक सिस्टर डे (नर्सेस) दिवसाचे औचित्य साधून बुधवारी तुरोरी आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आरोग्य कर्मचारी, ...
येथील व्यापारी महासंघाच्या वतीने जागतिक सिस्टर डे (नर्सेस) दिवसाचे औचित्य साधून बुधवारी तुरोरी आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाचे एन-९५ मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे गेल्या पंधरा महिन्यांपासून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सुटी तसेच वेळेची पर्वा न करता हे कर्मचारी व त्यांच्या मदतीला आशा कार्यकर्ती हे देवदूताचे कार्य करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांचा व्यापारी महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. आरोग्य केंद्रात आयोजित कार्यक्रमात व्यापारी महासंघाचे मुख्य सल्लागार अशोक जाधव-कारभारी, प्रशांत पाटील, अध्यक्ष अभिजीत जाधव-माडीवाले, उपाध्यक्ष बालाजी जाधव, सचिव बालाजी माणिकवार, दत्ता पवार यांच्या उपस्थितीत मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. शिल्पा सपली, आरोग्य कर्मचारी गणेश सुगावे, विजया कोळी व आशा कार्यकर्ती यांची उपस्थिती होती. याप्रसंगी अध्यक्ष अभिजीत जाधव-माडीवाले यांनी तुरोरी आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने केली.
फाेटाे ओळी...
तुरोरी येथील आरोग्य उपकेंद्रात व्यापारी महासंघाच्या वतीने जागतिक नर्सेस दिवसाचे औचित्य साधून आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांना उच्च दर्जाचे मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अशोक जाधव-कारभारी, प्रशांत पाटील, अभिजीत जाधव-माडीवाले, बालाजी जाधव, बालाजी माणिकवार, डॉ. शिल्पा सपली, गणेश सुगावे आदी.