काेराेना रूग्णांना माेफत जेवण अन् काडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:32 AM2021-05-26T04:32:51+5:302021-05-26T04:32:51+5:30
भूम : काेराेनाच्या दुसर्या लाटेत भूम शहरासह ग्रामीण भागातही माेठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले. हे सत्र आजही सुरूच आहे. ...
भूम : काेराेनाच्या दुसर्या लाटेत भूम शहरासह ग्रामीण भागातही माेठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले. हे सत्र आजही सुरूच आहे. रूग्ण आढळून आल्यानंतर त्यांना येथील काेविड केेअर सेंटरमध्ये ठेवले जाते. अशा रूग्णांना माेफत नास्ता, जेवण तसेच काडा देण्याचा उपक्रम शिवसंकल्प प्रतिष्ठानकडून हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.
काेराेनाची पहिली लाट ओेसरल्यानंतर सर्वकाही नाॅर्मल हाेत असतानाच दुसरी लाट येऊन धडकली. ही लाट तीव्र स्वरूपाची असल्याने रूग्णवाढही त्याच गतीने हाेत आहे. भूम शहरासह ग्रामीण भागात आढळून येणार्या व साैम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना येथील काेविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. अशा रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकंची जेवणाअभावी उपासमार हाेऊ नये, यासाठी शिवसंकल्प प्रतिष्ठानकडून ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून काेविड केअर सेंटरमधील गरजू रूग्णांसह नातेवाईकांना नियमित माेफत चहा, नास्ता व जेवण पुरविले जात आहे. एवढेच नाही तर इच्छुक रूग्णांना आयुर्वेदिक बहुगुणी काढाही दिला जात आहे. आजवर २६० जणांना हा काढा वाटप करण्यात आला. शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. याकामी प्रतिष्ठानचे विठ्ठल बाराते, संभाजी मोहिते, अजय शेंडगे अनिकेत आकरे, विठ्ठल बाराते आदी परिश्रम घेत आहेत.
चाैकट...
अन् आजीबाई ठणठणीत हाेऊन घरी परतल्या...
भूम येथील काेविड केअर सेंटरमध्ये ८० वर्षीय आजीबाई दाखल झाल्या हाेत्या. त्यांची ऑक्सिजन लेव्हल ५५ ते ६० एवढी हाेती. स्काेअर देखील २० हाेता. ही बाब समाेर येताच साेबत आलेले नातेवाईक निघून गेले. सदरील माहिती मिळाल्यानंतर विठ्ठल बाराते यांनी डाॅक्टरांशी संपर्क केला. त्यांना रेमडेसिविरची गरज असल्याचे ते म्हणाले. यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी बाहेरून स्वखर्चाने दाेन डाेस उपलब्ध करून दिले. उपचाराअंती आजीबाई बरे हाेवून घरी परतल्या आहेत.