मेधा पाटकर या परकीय एजंट; केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 16:17 IST2019-01-25T16:17:01+5:302019-01-25T16:17:43+5:30
देशाची विकास कामे थांबविण्यासाठी मेधा पाटकर यांना आर्थिक मदत दिली जाते.

मेधा पाटकर या परकीय एजंट; केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
उस्मानाबाद : मेधा पाटकरांना परकीय आर्थिक मदत मिळत असून त्या जोरावरच परकीय शक्तींकडून देशाची विकासकामे रोखण्यात येत असल्याचा खळबळजणक आरोप कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपालांनी केला आहे.
एबीपी माझाच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे. मेधा पाटकर ही एकटीच महिला एवढ्या ताकदीने लोकांना गोळा करते, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही महिला कशी विरोध करू शकते, यावर संशय आला होता. यामुळे त्यांच्याविरोधात केंद्र सरकारकडून चौकशी सुरु असल्याचा आरोप पुरुषोत्तम रुपालांनी केला.
मेधा पाटकर या परकीय एजंट; केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपालांचा गंभीर आरोप#MedhaPatkar#NarmadaBachav
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 25, 2019
नर्मदा आंदोलनासाठी पाटकरांना परदेशातून पैसे येतात. त्यांच्या सारख्या विरोधकांना देशाची विकास कामे थांबविण्यासाठी ही मदत दिली जाते. या परदेशी ताकदींची नावे नसतात, असेही त्यांनी सांगितले.