लोहारा तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांत भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 07:11 PM2024-01-15T19:11:45+5:302024-01-15T19:12:28+5:30
लोहारा तालुक्यातील माकणी, सास्तुरसह परीसरात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत.
- बालाजी बिराजदार
लोहारा (धाराशिव ): लोहारा तालुक्यातील माकणी परिसराला सोमवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटाच्या सुमारास २.३ रिस्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोहारा तालुक्यातील माकणी, सास्तुरसह परीसरात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. सोमवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटाच्या सुमारास लोहारा तालुक्यातील माकणी परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. जमीनितून गूढ आवाज आला. यामुळे जमिन हदरली. माकणी,खेड, करजगाव,धानुरी,चिचोली काटे या परिसरालाही भूकंपाचा धक्का बसल्याचे नागरिक सांगत आहेत. दरम्यान, दिल्ली येथे २.३ रिस्टरस्केलची नोंद झाली असल्याची माहिती कुलाबा मौसम विभागातील मौसम वैज्ञानिक (अ) किरण नारखेडे यांनी दिली. या जाणवलेल्या धक्क्यामुळे सन १९९३ साली झालेल्या प्रलंयकारी भूकंपाची अठवण जागी झाली.