युवकाने लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 08:06 PM2018-10-19T20:06:21+5:302018-10-19T20:07:10+5:30

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या युवकाने शेवटी लग्नास नकार देताच व्यथित झालेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गुरुवारी दुपारी विषारी द्रव प्राषन करून आत्महत्या केली़

Minor girl suicides due to marriage proposal rejection | युवकाने लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

युवकाने लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

googlenewsNext

भूम / आंबी (उस्मानाबाद) : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या युवकाने शेवटी लग्नास नकार देताच व्यथित झालेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने गुरुवारी दुपारी विषारी द्रव प्राषन करून आत्महत्या केली़ ही घटना भूम तालुक्यातील आनंदवाडी येथे घडली असून, याबाबत आंबी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मयत मुलीच्या आईने आंबी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, आनंदवाडी येथील रमेश भगवान वनवे याने तिच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखविले़ तिच्यावर वेळोवेळी जबरी अत्याचार केला़ त्यानंतर मात्र, रमेश वनवे याने मुलीस लग्नाला नकार दिला़ त्यामुळे या मुलीने गुरूवारी दुपारी घरातील विषारी द्रव प्राषन करून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ या फिर्यादीवरून रमेश भगवान वनवे याच्यासह त्याला सहकार्य करणारे महादेव श्रीपती वनवे, रामा केशव वनवे (तिघे रा़ आनंदवाडी ता़भूम) यांच्याविरूध्द आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक निरीक्षक वडदे हे करीत आहेत़

रुग्णालयात तणाव...
मयत मुलीचे पार्थिव गुरूवारी रात्री भूम ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते़ शुक्रवारी सकाळी नातेवाईकांनी ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदनाची मागणी लावून धरली होती़ यावरुन मोठा तणाव निर्माण झाला होता़ ही परिस्थिती लक्षात घेता ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदन करण्यासाठी पार्थिव सोलापूरला पाठविण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी सहायक निरीक्षक वडदे यांनी दिली़

Web Title: Minor girl suicides due to marriage proposal rejection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.