मल्टिस्टेटमध्ये अडकले काेट्यवधी रुपये, ग्राहक उतरले रस्त्यावर

By चेतनकुमार धनुरे | Published: September 15, 2023 04:19 PM2023-09-15T16:19:30+5:302023-09-15T16:19:49+5:30

बँकेची एसआयटी चाैकशी करा; भूम शहरातील गोलाई चाैकात रास्ता रोको 

Money stuck in multistate, customers protest on streets | मल्टिस्टेटमध्ये अडकले काेट्यवधी रुपये, ग्राहक उतरले रस्त्यावर

मल्टिस्टेटमध्ये अडकले काेट्यवधी रुपये, ग्राहक उतरले रस्त्यावर

googlenewsNext

भूम (जिल्हा धाराशिव) : तालुक्यातील ईट येथील जिजाऊ माॅसाहेब मल्टिस्टेटमध्ये शेतकरी, शेतमजूर, व्यापारी ग्राहकांचे काेट्यवधी रुपये अडकले आहेत. त्यामुळे या मल्टिस्टेटची एसआयटी, तसेच ईडी चाैकशी करून गुन्हे नाेंदवावेत, या प्रमुख मागणीसाठी ग्राहकांनी शुक्रवारी भूम शहरातील गाेलाई चाैकात रास्ता राेकाे आंदाेलन केले.

ईट येथे साधारणपणे बारा वर्षांपूर्वी जिजाऊ माॅसाहेब मल्टिस्टेट बँक सुरू झाली हाेती. या बँकेत ईटसह चांदवड, घाटनांदूर, पखरूड, डाेकेवाडी, नागेवाडी आदी गावांतील शेतकरी, शेतमजूर, व्यापाऱ्यांची खाती, तसेच ठेवी हाेत्या. परिसरातील ग्राहकांचे काेट्यवधी रुपये अडकले आहेत. अनेक खातेदारांचे साेयाबीनचे पैसे आहेत. खरेदीदार व कंपनीचे संगनमत हाेते. त्यामुळेच खासकरून शेतकरी ग्राहकांची फसवणूक झाली, असा आराेप करीत ठेवीदारांनी शुक्रवारी भूम शहरातील गाेलाई चाैकात रास्ता राेकाे आंदाेलन केले. संबंधित कंपनी आणि बँकेची एसआयटी, ईडी चाैकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी आंदाेनकर्त्या ठेवीदारांनी केली.
 

Web Title: Money stuck in multistate, customers protest on streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.