काळजी घ्या! धाराशिवमध्ये १ हजार ३५६ घरात आढळल्या डास अळ्या
By सूरज पाचपिंडे | Published: September 29, 2023 06:51 PM2023-09-29T18:51:54+5:302023-09-29T18:52:18+5:30
३४ हजार ३२२ घरातील पाणी साठ्याची तपासणी
धाराशिव : डेंग्यू, चिकुनगुणिया नियंत्रणाकरिता आरोग्य विभागाच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी ग्रामीण व शहरी भागात सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेअंर्गत जिल्ह्यातील ३४ हजार ३२२ घरातील सांड पाण्याची तपासणी करण्यात आली. यात १ हजार ३५६ घरांमध्ये पाणी साठ्यामध्ये डास आळ्या आढळून आल्या आहेत.
ज्या भागात आळ्या आढळून आल्या आहेत. त्या ठिकाणी ॲबेटिंग करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या दिवसात जागोजागी सांडपाणी साठून राहत असल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. परिणामी, डेंग्यू, चिकुनगुणिया आजार डोकेवर काढत आहे. अशा आजारावर नियंत्रण मिळावे, या करिता आरोग्य विभागाच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी शहरी तसेच ग्रामीण भागात डास अळी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील ७८२ गावांमध्ये आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ३४ हजार ३२२ घरात साठवलेल्या पाण्याची पाहणी करण्यात आली. यावेळी १ हजार ३५६ घरांतील पाणी साठ्यामध्ये डास आळी आढळून आली. आरोग्य विभागाने तातडीने ॲबेटिंग करुन अळ्या नष्ट केल्या आहेत. शिवाय, नागरिकांना आठवड्यातील एक दिवस काेरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे.