नियम माेडणाऱ्यांवर आता पालिकेच्या पथकांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:29 AM2021-04-03T04:29:03+5:302021-04-03T04:29:03+5:30
आठ पथकांची स्थापना - एका पथकात दहा कर्मचाऱ्यांचा समावेश उस्मानाबाद - मागील काही दिवसांपासून काेराेना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ ...
आठ पथकांची स्थापना - एका पथकात दहा कर्मचाऱ्यांचा समावेश
उस्मानाबाद - मागील काही दिवसांपासून काेराेना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनही अलर्ट झाले आहे. काेविडच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता नजर ठेवण्यासाठी पालिकेनेही कंबर कसली आहे. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या सूचनेनुसार कारवाईसाठी आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. एका पथकात जवळपास दहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात काेराेना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक भर पडू लागली आहे. तसेच मृत्युदरही हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनही आता उपायाेजनांवर अधिक भर दिला आहे. यात आता पालिकाही मागे राहिली नाही. जनजागृतीसह अन्य उपायाेजना हाती घेण्यात आल्या आहेत. काेविडच्या अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियमांची काटेकाेर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पालिकेकडून जवळपास आठ पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराव पवार, कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी यांच्यावर साेपविली आहे. यांच्या साेबतीला सहनियंत्रण अधिकारी देण्यात आले आहेत. कारवाईसाठी प्रत्येक पथकाला विभाग निश्चित करून देण्यात आले आहेत. प्रतिदिन केलेल्या कारवाईचा अहवाल हे अधिकारी नियंत्रण अधिकाऱ्यांना देतील.
चाैकट....
कारवाईसाठी विभाग नश्चित
कारवाईसाठी आठ पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात दाेन सहनियंत्रण अधिकारी असतील. दाेन टीम प्रमुख तर सहा मदतनीस असतील. या पथकांना विभाग निश्चित करून देण्यात आले आहेत. या पथकांच्या माध्यमातून विना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे. तसेच हाेम आयसाेलेशन घरांवर देखरेख ठेवणे, घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करणे, घरांतील स्वतंत्र व्यवस्थेबाबत खात्री करणे, हाेम आयसाेलेशन घरावर स्टिकर लावलेल्यांची खात्री करण्याची जबाबदारी साेपविली आहे.
काेट...
काेराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आठ पथके निर्माण करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून शहरातील विविध भागात कारवाईची माेहीम राबविली जाणार आहे. नागरिकांनी काेविड नियमांचे पालन करावे.
-मकरंद राजेनिंबाळकर, नगरध्यक्ष, उस्मानाबाद.