परंडा शहरातील भरचाैकात खून, दाेघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:09 AM2021-09-02T05:09:21+5:302021-09-02T05:09:21+5:30
उस्मानाबाद/भूम -‘आम्ही कसाब असताना बाहेर गावातून बैलाचे मटण आणून का विकताे’ असा जाब विचारत दाेघांनी संगनमत करून एकाचा परंडा ...
उस्मानाबाद/भूम -‘आम्ही कसाब असताना बाहेर गावातून बैलाचे मटण आणून का विकताे’ असा जाब विचारत दाेघांनी संगनमत करून एकाचा परंडा शहरातील भरचाैकात चाकूने भाेसकून खून केला हाेता. हे प्रकरण भूम सत्र न्यायालयात चालले असता, समाेर आलेले पुरावे, साक्ष आणि अति. सरकारी अभियाेक्त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अति. सत्र न्यायाधीश जयराज वडणे यांनी मंगळवारी संबंधित दाेघांनाही जन्मठेप व प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली.
याबबात अतिरिक्त शासकीय अभियाेक्ता के. डी. काेळपे यांनी दिलेली माहिती अशी की, परंडा येथील मयत हैदर अली शैकत अली शेख हे बाहेर गावातून बैलाचे मटण आणून विकत हाेते. हाच राग धरून ११ फेब्रुवारी २०१५ राेजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ‘आम्ही गावात कसाब असतानाही बाहेरगावातून मटण आणून का विकताेस’’ असा जाब विचारत परंडा शहरातीलच आझाद चाैकाजवळ सद्दाम कुरेशी याने हातातील काठीने हैदर यांना बेदम मारहाण केली. यानंतर सलमानने हैदरच्या पाेटात धारदार चाकू भाेसकून जखमी केले. उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ फेब्रुवारी राेजी हैदर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत हैदर यांच्या वडिलांनी परंडा पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली हाेती. सदरील प्रकरणात उपराेक्त दाेघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असता, सपाेनि सुरेश शिरसाट यांनी तपास करून न्यायालयात दाेषाराेपपत्र सादर केले. हे प्रकरण सत्र न्यायालय भूम येथे चालले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदारांचे जबाब नाेंदविण्यात आले. न्यायालयासमाेर आलेले पुरावे, साक्ष आणि सरकारी अभियाेक्ता यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अति. सत्र न्यायाधीश जयराज वडणे यांनी सलमान ऊर्फ सलीम रफिक कुरेशी आणि सद्दाम मकसूद कुरेशी यांना जन्मठेप व प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभयाेक्ता ॲड. किरण काेळपे यांनी बाजू मांडली. त्यांना विधिज्ञ एच. एन. वाघमाेडे यांचे सहकार्य लाभले. पैरवी अधिकारी म्हणून सपाेफाै बाजीराव काळे यांनी काम पाहिले.