उदगीरात लॉजसमोर एकाचा खून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 08:04 PM2021-01-30T20:04:30+5:302021-01-30T20:05:08+5:30

एका लॉजसमोर ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

Murder of one in Udgir, accused in police custody | उदगीरात लॉजसमोर एकाचा खून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

उदगीरात लॉजसमोर एकाचा खून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देकंबरेच्या बेल्टने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केला

उदगीर (जि. लातूर) : येथील बिदर रोडवरील उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या एका लॉजसमोर ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले की, उमेश मुरलीधर उकंडे (रा.भालकी, जि.बिदर) याला बिदरगेटच्या उड्डाणपुलाजवळ असलेल्या लॉजमध्ये काम करणाऱ्या युवराज दिलीप पाटील (रा. हळद वाढवणा, ता.जळकोट) याने लॉजजवळ का बसलास, असे म्हणत कंबरेच्या बेल्टने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारल्याची फिर्याद मयताच्या आईने दिली. त्यावरून शनिवारी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी युवराज पाटील यास ताब्यात घेतले आहे.

Web Title: Murder of one in Udgir, accused in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.