मुरुमध्ये ६५ जणांवर उपचार, ९ जणांना दिला डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:26 AM2021-05-03T04:26:41+5:302021-05-03T04:26:41+5:30
मुरू : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड संशयित आणि संपर्कातील लोकांची शुक्रवार, शनिवार, रविवारी रॅपिड अँटिजेन चाचणी केल्यानंतर मागील ...
मुरू : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड संशयित आणि संपर्कातील लोकांची शुक्रवार, शनिवार, रविवारी रॅपिड अँटिजेन चाचणी केल्यानंतर मागील तीन दिवसांत १५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. रविवारी झालेल्या अँटिजेन चाचणीत शहरातील केवळ एक आणि ग्रामीण भागात तीन रुग्ण असे चार रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले, तर उपचारानंतर बरे झालेल्या नऊजणांना डिस्चार्ज देण्यात आला. मुरुच्या कोविड रुग्णालयात उमरगा व लोहारा तालुक्यातील ६५ जणांवर उपचार सुरू आहेत.
मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी झाल्याने नागरिकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. शहर व परिसरात मागील आठ दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले होते. मात्र, शनिवारी आणि रविवारी कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना काहीअंशी दिलासाच मिळाला आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि आलूर आरोग्य केंद्रात झालेल्या चाचणीत केसरजवळगा येथील ५ जण बाधित असल्याचे आढळून आले. शहरासाठी आज दिलासा मिळाला आहे. फक्त दोघांनाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, तर शहरातील एका ५० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान शुक्रवारी उमरगा येथे मृत्यू झाला आहे. उपचारानंतर बरे झालेल्या १९ जणांना दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील बाधितांची संख्या १४५ वर पोहोचली असून सध्या ७२ रुग्ण उपचाराखाली आहेत. आतापर्यंत उपचारानंतर बरे झालेल्या ७० जणांना डिस्चार्ज देण्यात आले असून तीनजणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. विविध ठिकाणी सध्या ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये उमरगा येथे ४ कोविड सेंटरमध्ये ४३, गृहविलगीकरणात २५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
पाॅईंटर...
शहरातील ग्रामीण रुग्णालयात व आलूर आरोग्य केंद्रात झालेल्या मागील तीन दिवसांच्या चाचणीत शहरातील यशवंतनगर व अशोक चौक, मुदकण्णा गल्ली, अंबरनगर तांडा येथे प्रत्येकी एक, केसरजवळगा ५, कलदेव लिंबाळा ३, तुगाव २ , येणेगुर २ , बेळंब, महालिंगरायवाडी येथे प्रत्येकी एक अशा १८ रुग्णांची शहर व ग्रामीण भागात भर पडली, अशी माहिती आरोग्य विभाग आणि पालिकेकडून देण्यात आली.