कळंबमध्ये ‘माझी शिधापत्रिका माझा हक्क’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:33 AM2021-08-15T04:33:27+5:302021-08-15T04:33:27+5:30
या मोहिमेंतर्गत १७ ऑगस्ट रोजी येरमाळा, १८ रोजी ईटकूर, २० रोजीला मस्सा (खं), २३ ऑगस्टला कळंब शहर व मंडळातील ...
या मोहिमेंतर्गत १७ ऑगस्ट रोजी येरमाळा, १८ रोजी ईटकूर, २० रोजीला मस्सा (खं), २३ ऑगस्टला कळंब शहर व मंडळातील गावे, २४ ऑगस्ट रोजी मोहा, २५ ला शिराढोण, २६ ला नायगाव तर २७ ऑगस्ट रोजी गोविंदपूर या मंडळातील गावामधील नागरिकांच्या ऑनलाईन अर्जाची प्रत तहसील कार्यालयात सकाळी ११ ते ३ या वेळेमध्ये स्वीकारली जाणार आहे. या मोहिमेत शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, नावात दुरुस्ती करणे, दुय्यम शिधापत्रिका देण्यात येणार आहे. यासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज सर्व सेतू केंद्रात उपलब्ध आहेत. त्या अर्जात माहिती भरून ते ऑनलाईन भरावयाचे आहेत. त्याची प्रत व संबंधित कागदपत्रे वरील तारखेदिवशी त्या-त्या मंडळातील गावांतील नागरिकांनी तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.
ज्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात येणे शक्य नाही त्यांनी सदर अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून त्या-त्या गावातील रेशन दुकानदाराकडे जमा करावेत, असे आवाहन पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नीतेश काळे यांनी केले आहे.