राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांची विजयी घोडदौड

By बाबुराव चव्हाण | Published: November 21, 2022 07:04 PM2022-11-21T19:04:58+5:302022-11-21T19:06:20+5:30

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

National Championship Kho-Kho Tournament; Winning horse race for both men and women teams of Maharashtra | राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांची विजयी घोडदौड

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांची विजयी घोडदौड

googlenewsNext

उस्मानाबाद : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखताना पुरुषांनी उत्तराखंडवर तर महिलांनी अरुणाचल प्रदेशवर डावाने विजय साजरे केले.

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात २४ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्रने उत्तराखंडवर १७-७ असा १:१० मि. राखून डावाने धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या रामजी कश्यप व प्रतीक वाईकर (प्रत्येकी २:४० मि. संरक्षण व १ गुण), अक्षय मासाळ (२:१० मि. व ३ गुण), लक्ष्मण गवस (२:१० मि. संरक्षण व २ गुण), सुरज शिंदे (२:२० मि. संरक्षण) व गजानन शेंगाळ (३ गुण) यांनी आपल्या शानदार खेळाची झलक दाखवताना महाराष्ट्राला डावाने विजय मिळवून दिला. पराभूत उत्तराखंडच्या शशिकांतने एकहाती लढत दिली. महिलांच्या सामन्यात महाराष्ट्रने अरुणाचल प्रदेशचा १८-३ असा एक डाव १५ गुणांनी एकतर्फी धुव्वा उडवला.

महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळे (५ गुण), स्नेहल जाधव (नाबाद २ मि. संरक्षण व २ गुण), प्रतीक्षा बिराजदार (२:४० मि. संरक्षण), प्रीती काळे व श्रेया सनगरे (प्रत्येकी २:१० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (४ गुण), दीपाली राठोड (३ गुण), अपेक्षा सुतार व पूजा फरगटे (प्रत्येक २ गुण) यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्राला मोठा विजय मिळविणे सहज शक्य झाले. पराभूत अरुणाचल प्रदेशच्या प्रेमाने थोडीफार चांगली कामगिरी केली. महिलांच्या दुसऱ्या एका सामन्यात गोव्याने सीमा सुरक्षा बलचा १८-४ असा एक डाव १४ गुणांनी धुव्वा उडवला. गोव्याच्या काशी गावकरने (४:२० मि. संरक्षण व ३ गुण), अश्विनी वेळीपने (४:३० मि. व २ गुण), दीप्ती वेळीपने (नाबाद ४:३० मि. संरक्षण) करून विजयात मोलाची कामगिरी बजावली. तर पराभूत सीमा सुरक्षा बलच्या अश्विनी चव्हाणने एकाकी लढत दिली.

विदर्भ संघाने मिळवला एकतर्फी विजय...
पुरुषांच्या सामन्यात विदर्भाने दुबळ्या जम्मू-काश्मीरवर २३-८ असा एकतर्फी विजय मिळवला. अक्षय उमाते, दिलराजसिंग सेनगर, राज सिसोदिया त्यांनी चांगला खेळ केला तर जम्मू-काश्मीरच्या कोणत्याही खेळाडूला विशेष प्रभाव पडता आला नाही. कोल्हापूरच्या महिलांनीसुद्धा जम्मू-काश्मीरचा ३२-६ असा एक डाव २६ गुणांनी धुव्वा उडवला. पुरुषांच्या सामन्यात कोल्हापूरने त्रिपुराचा २८-८ असा एक डाव २० गुणांनी पराभव केला.

अन्य निकाल :
महिला गट : मध्य भारत वि. भारतीय तिबेट सीमा सुरक्षा बल २५-१ डावाने, हरियाणा वि. बिहार २७-४ डावाने, प. बंगाल वि. सीमा सुरक्षा बल २८-५ डावाने, दिल्ली वि. उत्तराखंड १९-५ डावाने, विदर्भ वि. छत्तीसगड ८-६ डावाने, ओडिशा वि. मणिपूर १८-३ डावाने यश मिळवले.

पुरुष गट : पंजाब वि. भारतीय तिबेट सुरक्षा बल २५-७ डावाने, प. बंगाल वि. चंडीगड १६-११ डावाने, ओडिशा वि. सीमा सुरक्षा बल १७-६ डावाने, भारतीय रेल्वे वि. २९-४ डावाने, मणिपूर वि. अरुणाचल प्रदेश १६-९ डावाने विजय मिळवला.

Web Title: National Championship Kho-Kho Tournament; Winning horse race for both men and women teams of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.