राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यास जिल्हा रुग्णालयात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:35 AM2021-08-27T04:35:48+5:302021-08-27T04:35:48+5:30

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन देशमुख, कोविड नोडल अधिकारी डॉ. इस्माईल मुल्ला, डॉ. नानासाहेब गोसावी, नेत्रविभागाचे प्रमुख डॉ. ...

National Eye Donation Fortnight begins at District Hospital | राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यास जिल्हा रुग्णालयात सुरुवात

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यास जिल्हा रुग्णालयात सुरुवात

googlenewsNext

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन देशमुख, कोविड नोडल अधिकारी डॉ. इस्माईल मुल्ला, डॉ. नानासाहेब गोसावी, नेत्रविभागाचे प्रमुख डॉ. अर्चना गोरे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. मुस्तफा पल्ला, डॉ. विरभद्र कोटलवाड, डॉ. महेश पाटील, नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे, रेणुका भावसार, अधिसेविका सुमित्रा गोरे, नेत्र विभागाचे वॉर्ड इन्चार्ज रऊफ शेख तसेच नेत्रविभागातील सर्व अधिपरिचारिका आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

डॉ. महेश पाटील यांनी नेत्रदान आणि अंधत्वाबाबतची सद्य:स्थिती तसेच नेत्रदानाची आवश्यकता आणि महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन देशमुख यांनी नेत्रदानाकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहणे आणि याची सुरुवात ही स्वत:पासून करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोपात करताना डॉ. पाटील यांनी नेत्रदान आणि अवयवदान या चळवळी समजून प्रत्येकाने यामध्ये सहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. संतोष पोतदार यांनी आभार मानले.

चौकट............

यांचा झाला सत्कार

यावेळी रुग्णालयातील कर्मचारी राजेंद्र दिलपाक यांनी आपल्या पत्नीचे मृत्यूनंतर नेत्रदान करून दोन अंध व्यक्तींना जग पाहण्यासाठी संधी दिली. याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजेंद्र दिलपाक आणि त्यांचा मुलगा सचिन दिलपाक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना साथरोगाच्या काळात कोविड रुग्णांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नर्सिंग स्टॉफ यांचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: National Eye Donation Fortnight begins at District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.