तहसील कार्यालयाला आले जत्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:31 AM2020-12-31T04:31:25+5:302020-12-31T04:31:25+5:30

तालुक्यातील ईटकूर, येरमाळा, दहिफळ, रांजणी, मंगरूळ, नायगाव, पाडोळी, चोराखळी या मोठ्या ग्रामपंचायतींसह ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार ...

The nature of the fair came to the tehsil office | तहसील कार्यालयाला आले जत्रेचे स्वरूप

तहसील कार्यालयाला आले जत्रेचे स्वरूप

googlenewsNext

तालुक्यातील ईटकूर, येरमाळा, दहिफळ, रांजणी, मंगरूळ, नायगाव, पाडोळी, चोराखळी या मोठ्या ग्रामपंचायतींसह ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटच्या दिवशी सकाळपासूनच इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे जथ्थे तहसील कार्यालय परिसरात दाखल होत होते. दुपारच्या सुमारास यात वृद्धी होत जात परिसराला जत्रेचे स्वरूप आले. वाहनांच्या रांगा, माणसांनी फुललेला परिसर व हातात कागदपत्रांची जंत्री घेऊन धावपळ करणारे गावपुढारी जागोजागी दिसून येत होते. इमारतीमधील निवडणूक निर्णय अधिकारी कक्षातही अशीच गर्दी दिसून येत होती. यावेळी कोरोनाचा विसर पडल्याचे स्पष्ट दिसून येत होते.

चौकट...

विक्रमी अर्ज दाखल

तालुक्यात ५९ ग्रा. पं. च्या १८८ प्रभागांतील एकूण ४९५ सदस्यांच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत......एवढे विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत.

या गावात सर्वाधिक अर्ज

या टप्प्यातील सर्वात मोठी ग्रा.पं. ईटकूर असून येथे १५ सदस्य आहेत. तर येरमाळा व मंगरूळ येथे १३ सदस्य आहेत. यापैकी इटकूर येथे .... अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करणारे हे गाव ठरले आहे. त्याखालोखाल येरमाळा ... अर्ज, मंगरूळ ... अर्ज, चोराखळी ... अर्ज, दहिफळ ... अर्ज दाखल झाले आहेत.

दोन ग्रा. पं. बिनविरोध ?

तालुक्यातील भाटशिरपुरा व आडसूळवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्यात जमा आहेत. भाटशिरपुरा येथे नऊ जागेसाठी नऊच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय सात सदस्यांच्या आडसूळवाडी ग्रामपंचायतीसाठीही सातच अर्ज दाखल झाल्याने या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होणार आहे.

Web Title: The nature of the fair came to the tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.