आगामी निवडणुकीतही राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:34 AM2021-09-03T04:34:29+5:302021-09-03T04:34:29+5:30
कळंब : माझं शहर बदलतंय, विकासाकडे वाटचाल करतंय अशी शहरवासीयांमधून उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. ही नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या सत्ताधारी ...
कळंब : माझं शहर बदलतंय, विकासाकडे वाटचाल करतंय अशी शहरवासीयांमधून उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. ही नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या सत्ताधारी मंडळींच्या कामाची पावती आहे. याच कामाच्या बळावर आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कळंब पालिकेत एकहाती सत्ता मिळवेल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी व्यक्त केला.
कळंब शहर राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने १ सप्टेंबरला नवनियुक्त प्रदेश चिटणीस सुरेश पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष संजय दूधगावकर यांचा सत्कार शहराध्यक्ष मुसद्दीक काझी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी दुधगावकर पुढे म्हणाले की, सांघिक काम केले असता यश हे आपलेच आहे. विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, ही भूमिका कायम ठेवा. यावेळी पक्षाचे नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची विकासाची भूमिका तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात केलेली विकासकामे सांगितली. मागील सत्ताधारी मंडळींनी न. प.चा कारभार चारचौघांत सीमित केला होता. आमच्या सत्ताकाळात लोकाभिमुख व पारदर्शक कारभार केल्याने निश्चितच आगामी पालिका निवडणुकीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. संजय कांबळे, ज्येष्ठ नेते भास्कर खोसे, अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्ष महम्मद चाऊस, जिल्हाध्यक्ष खलील पठाण, तालुका कार्याध्यक्ष रमेश देशमुख, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सुनंदा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, सागर मुंडे, गटनेते लक्ष्मण कापसे, नगरसेवक अमर गायकवाड, सुभाष पवार, शकील काझी, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष नारायण चोंदे, शहर उपाध्यक्ष महेबुब शेख, कार्याध्यक्ष बाळासाहेब कथले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पद्माकर पाटील, कार्याध्यक्ष उमेश मडके, शहराध्यक्ष रणजित खोसे, शहर कार्याध्यक्ष नीलेश पोतदार, तालुका सरचिटणीस सुहास कवडे, अल्पसंख्याक विभाग जिल्हा महासचिव सरकार, तालुकाध्यक्ष अतिक पठाण, शहराध्यक्ष सर्फराज मोमीन, महिला तालुकाध्यक्ष सलमा सौदागर, शहराध्यक्ष मुन्नी सय्यद, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष किरण मस्के ,सुमित रणदिवे, बापू सावंत, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ शिंदे, वक्ता प्रशिक्षण विभागाचे तालुकाध्यक्ष रणजित वरपे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष भीमा हगारे, स्वप्निल चिलवंत, सरचिटणीस अल्ताफ तांबोळी, हुजेब बागवान, आदी उपस्थित हाेते. शहराध्यक्ष मुसद्दीक काझी यांनी सूत्रसंचालन केले, तर अविनाश घोडके यांनी आभार मानले.