राष्ट्रवादीच्या ‘परिवार संवादात’ आमदार आपलाच हवाचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:32+5:302021-06-25T04:23:32+5:30
तुळजापूर : गेली अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीला तुळजापूर विधानसभा ही दिली गेली नाही, त्यामुळे पक्षवाढीसाठी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा ...
तुळजापूर : गेली अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीला तुळजापूर विधानसभा ही दिली गेली नाही, त्यामुळे पक्षवाढीसाठी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा राष्ट्रवादीचा असला पाहिजे, अशी मागणी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तुळजापूर येथे आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात लावून धरली. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुळजापूर तालुका, युवक, महिला, युवती व विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकारी यांच्या पक्षवाढीच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, माजी आ. राहुल मोटे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
बैठकी दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुळजापूर तालुका महिला, युवती, युवक ओबीसी, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, विद्यार्थी आघाडी यांच्याकडून किती सदस्य आहेत? किती कार्यकरणी आहेत? त्यांचे कार्य काय आहे? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बुथ किती आहे? किती कमिट्या आहेत? आदी बाबींचा आढावा घेतला. यावेळी पदाधिकारी यांनी सांगितलेल्या सदस्यांपैकी आढावा बैठकीत सदस्य कमी असल्याचे आढळून आले. तसेच महिला पदाधिकार्यांचीही संख्या अल्पच हाेती. याबाबत विचारणा केली असता, काेराेनाचे कारण सांगत वेळ मारून नेली. यानंतर कार्यकर्ते, पदाधिकारी यांना बोलण्याची संधी दिल्यानंतर अनेकांनी गटबाजीवर बाेट ठेवले. गटतट असल्याने कार्यकर्त्यांनी जायचे काेणाकडे? असा सवाल केला. तालुक्यात राष्ट्रवादीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या कमी नाही. परंतु, आमदार आपले नसल्याने अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. याप्रसंगी काहींनी २१ टीएमसी पाणी, एमआयडीसी, तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना आदी प्रश्न मांडून याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.
चाैकट....
अशोक जगदाळे यांच्या भूमिकेसंदर्भात कार्यकर्त्यांनी अपेक्षा घेऊन ते पक्षात आहेत का? असतील तर तसे स्पष्ट करावे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे, असे सांगत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जगदाळे यांची बाजू घेत, एखाद्या व्यक्तीला प्रवेश घ्या असा विषय मांडायच्या अगोदरच तो व्यक्ती म्हणतोय मी पक्षातच आहे. एवढेच नाही तर जगदाळे यांनी न.प.ची निवडणूक जनतेतून लढविली आहे. विधान परिषद निवडणूकही अटीतटीची झालरी. ते केवळ ७४ मतांनी पराभूत झाले. या निवडणुकीत जगदाळे पडले नाहीत तर पक्ष पडला. त्यांच्या बाबतीत जे राजकारण झाले ते झाले. ते पक्षातच आहेत. त्यामुळे हा विषय आता संपला आहे, असे मंत्री मुंडे म्हणाले.