गरज अडीच हजार, मिळाले अवघे ५६० डाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:59+5:302021-05-13T04:32:59+5:30
कळंब उपजिल्हा रुग्णालयात २५९७ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. त्यापैकी केवळ ३३४ जणांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. दरम्यान, ...
कळंब उपजिल्हा रुग्णालयात २५९७ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. त्यापैकी केवळ ३३४ जणांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात काही दिवसापूर्वी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाली होती; परंतु ती १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात आली. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिनसाठी वेटिंगवर राहावे लागले होते.
बुधवारी कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी शहरातील लसीकरण केंद्रावर पहाटेपासून गर्दी झाली होती. दोन दिवसांसाठी फक्त ५६० डोस कळंबसाठी उपलब्ध झाले आहेत. अनेकांची किंबहुना जवळपास सर्वांचीच २८ दिवसांची म्हणजेच दुसऱ्या डोसची मुदत संपली आहे. काही जणांचा पहिला डोस घेऊन दोन महिन्यांचा कालावधी संपला असून, त्यांनाही दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे.
कळंब उपजिल्हा रुग्णालयाला मिळालेला ५६० चा स्टॉक संपल्यानंतर पुढे कोव्हॅक्सिन कधी उपलब्ध होणार याची माहिती आरोग्य विभागाकडेही नाही. त्यामुळे कळंब येथील आणखी 2 हजार नागरिकांना दुसऱ्या डोससाठी किती दिवस वाट बघावी लागेल, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो आहे.
फाेटाे ओळी........
कळंब येथील लसीकरण केंद्राबाहेर बुधवारी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी सकाळपासूनच अशी गर्दी केली होती.