गुंजोटी उपकेंद्रात नवीन ट्रान्सफार्मर कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:35 AM2021-03-23T04:35:16+5:302021-03-23T04:35:16+5:30

गुंजोटी : येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रातील नवीन पाच मेगावॅटचे ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ आ. ज्ञानराज ...

New transformer operational at Gunjoti substation | गुंजोटी उपकेंद्रात नवीन ट्रान्सफार्मर कार्यान्वित

गुंजोटी उपकेंद्रात नवीन ट्रान्सफार्मर कार्यान्वित

googlenewsNext

गुंजोटी : येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रातील नवीन पाच मेगावॅटचे ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एम. ए. सुलतान, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, पं. स. सदस्या क्रांती व्हटकर, सरपंच सरस्वती कारे, उपसरपंच आयूब मुजावर, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र शेंडेकर, सहायक अभियंता शिवराज दहिफळे, माजी सरपंच सहदेव गायकवाड़, प्रदीप शिवनेचारी, सोसायटीचे अध्यक्ष बलभीम शाईवाले, सचिव बालाजी पोतदार, ओम शिंदे, किसन पाटील, बसवराज टोंपे, ग्रा. पं. सदस्य योगेश शिंदे, श्रीनिवास हिरवे, शेषराव खंडागळे, सुरेश सूर्यवंशी, राहुल माने, रवी देशमुख, इंद्रजीत म्हेत्रे, विजया चव्हाण, स्नेहा पाटील, कौशल्या बेळमकर, सुनीता जेटीथोर, अंजुम औटी, शीतल हाके, रिहाना खुरेशी, जयश्री कलशेट्टी, उस्मान सय्यद, हुसेन पिरजादे, प्रधान तंत्रज्ञ युवराज माने, लाईनमन जितेंद्र दुबे, दत्ता मुगळी, ऑपरेटर सुशांत कणेरे यांच्यासह ‘महावितरण’चे कर्मचारी उपस्थित होते.

फोटो: गुंजोटी येथे वीज उपकेंद्रातील नवीन पाच मेगावॅट ट्रान्सफार्मरचा शुभारंभ करताना आमदार ज्ञानराज चौगुले. समवेत यावेळी सभापती एम. ए. सुलतान, बाबूराव शहापुरे, राजेंद्र शेंडेकर व अन्य.

Web Title: New transformer operational at Gunjoti substation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.