यंदा जिल्ह्यात ना टँकर, ना अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:30 AM2021-05-22T04:30:08+5:302021-05-22T04:30:08+5:30

उस्मानाबाद -उन्हाळा सुरू झाला की जिल्ह्यातील अनेक वाडी, तांड्यांसह गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डाेके वर काढत असे. अनेकवेळा एकेका ...

No tankers, no acquisitions in the district this year | यंदा जिल्ह्यात ना टँकर, ना अधिग्रहण

यंदा जिल्ह्यात ना टँकर, ना अधिग्रहण

googlenewsNext

उस्मानाबाद -उन्हाळा सुरू झाला की जिल्ह्यातील अनेक वाडी, तांड्यांसह गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डाेके वर काढत असे. अनेकवेळा एकेका गावातील शिवारात टँकर भरण्यासाठीही जलस्त्राेत उपलब्ध हाेत नव्हते. मात्र, गतवर्षी जिल्हाभरात मुबलक पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून की काय, यंदा पावसाळा ताेंडावर आला असतानाही एकही टँकर वा जलस्त्राेत अधिग्रहित करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावलेली नाही. मे २०२० मध्ये म्हणजेच गतवर्षी १८ टँकर अन् २७५ जलस्त्राेतांचे अधिग्रहण करावे लागले हाेते.

मागील काही वर्षांत उस्मानाबाद बराेबर पाणीटंचाई हे समीकरण निर्माण झाले हाेते. एप्रिल, मे महिन्यात तर टंचाईचे सावट अधिक गडद हाेत असे. वाडी, वस्ती, तांडा तसेच गावागावांतून पिण्याच्या पाण्यासाठी ओरड हाेत असे. अशावेळी प्रशासनाला दाेरीवरची कसरत करावी लागत हाेती. दरम्यान, मागील वर्षी जिल्ह्याच्या सर्वच भागात जाेरदार पाऊस झाला. सीना-काेळेगावसारखे माेठे धरण शंभर टक्के भरले. लहान-माेठे प्रकल्पही ओव्हरफ्लाे झाले हाेते. त्यामुळेच की काय, यंदा जिल्ह्यात ना टँकर सुरू आहे, ना जलस्त्राेतांचे अधिग्रहण करावे लागले. सध्या जिल्हा टँकरमुक्त आहे. दरम्यान, गतवर्षी याच काळात म्हणजेच मे अखेर १८ टँकर व २७५ जलस्त्राेतांचे अधिग्रहण करून टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात हाेता. शेजारचे लातूर, नांदेड आदी जिल्ह्यात काही ना काही गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या उस्मानाबादकरांसाठी ही बाब दिलासा देणारीच म्हटली पाहिजे.

काेट...

जिल्ह्यात मागील वर्षी जाेरदार पाऊस झाला हाेता. त्यामुळे बहुतांश लहान-माेठे प्रकल्प तुडुंब भरले. त्यामुळेच यंदा मे महिना सरत आला असला तरी एकही टँकर वा अधिग्रहणाची मागणी नाही. भविष्यात टँकर वा अधिग्रहणांची मागणी झाल्यास तातडीने उपाययाेजना केल्या जातील.

-देवकर, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

Web Title: No tankers, no acquisitions in the district this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.