उमरगा नगराध्यक्षांना नगरविकास विभागाची नाेटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:23 AM2021-06-26T04:23:14+5:302021-06-26T04:23:14+5:30

उमरगा : येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या विरुद्ध १५ नगरसेवकांनी पालिकेत विविध विकासकामांत आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार ...

Notice of Urban Development Department to Umarga Mayor | उमरगा नगराध्यक्षांना नगरविकास विभागाची नाेटीस

उमरगा नगराध्यक्षांना नगरविकास विभागाची नाेटीस

googlenewsNext

उमरगा : येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या विरुद्ध १५ नगरसेवकांनी पालिकेत विविध विकासकामांत आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून चौकशी करून आराेपांत तथ्य असल्याचा चौकशी अहवाल आपल्या अभिप्रायासह शासनास सादर केला होता. या अहवालाच्या अनुषंगाने नगरविकास विभागाच्या अवर सचिवांनी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना पदावरून दूर करून ६ वर्षासाठी निवडणूक लढविण्यास बंदी का घालू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बुधवारी बजावली. खुलासा सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.

उमरगा पालिकेतील जवळपास १५ नगरसेवकांनी नगराध्यक्षा टाेपगे यांच्याविरुद्ध विकास कामांत गैरव्यवहार केल्याचा आराेप केला हाेता. यानंतर जिल्हाधिकारी यांनी चाैकशी समिती नेमली हाेती. सदरील अहवालानुसार मुद्दा क्र.१(३), मुद्दा क्र.२, ३, ४, ५, ७ नुसार १९६५ च्या अधिनियमातील कलम ५८ (२) मध्ये तातडीच्या प्रकरणांत एखादे काम करण्याचे आदेश देण्याचे नगराध्यक्षांना अधिकार आहेत. या अधिकारांचा आपण गैरवापर केला आहे. नगराध्यक्षाच्या सहमतीने अर्थिक व धोरणात्मक विषय, ऐनवेळचा ठराव सभेसमोर ठेवून मंजूर करण्यात आले आहेत. ही कार्यवाही नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या स्थायी आदेशाविरुद्ध आहे, तसेच सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता व गुणवत्ता तपासणी न करता १० लाख रुपये किमतीची मुरुम खरेदी जाहीर निविदा मागविल्याचे दाखवून प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त रकमेचा मुरूम टाकण्याचे काम करण्यात आले. तसेच देयके प्रदान केली आहेत. विहित प्रक्रियेचा अवलंब न करता कायदेशीर सल्लागार या एकाच पदावर दोघांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालातील निष्कर्षांसोबतच शासन आदेशाचे उल्लंघन

करून कामनिश्चिती, निविदा मंजुरी व देयक अदा करून अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. उपराेक्त बाब ही महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५५ अ व ब चा भंग करणारी आहे. त्यामुळे आपणास नगराध्यक्ष पदावरून दूर करून, पुढील ६ वर्षाच्या कालावधीसाठी पालिका सदस्य होण्यास किंवा कोणत्याही इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अनर्ह का ठरविण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नाेटीस बजावण्यात आली आहे. नोटीस प्राप्त झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.

चाैकट...

नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा...

नगरविकास विभागाच्या वतीने नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसीच्या मुद्द्यावरून शुक्रवारी पालिकेतील विरोधी पक्ष शिवसेना व राष्ट्रवादीबरोबरच पालिकेत काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या भाजपने पत्रकार परिषद घेत नैतिकता दाखवून नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष रझाक अत्तार, शिवसेनेचे पालिकेतील गटनेते संतोष सगर, राष्ट्रवादीचे गटनेते संजय पवार व सत्तेतील भाजपचे गटनेते इराप्पा घोडके यांनी ही पत्रकार परिषद घेतली.

Web Title: Notice of Urban Development Department to Umarga Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.